मनपाच्या भूखंडावरच अतिक्रमण
By admin | Published: August 5, 2015 12:30 AM2015-08-05T00:30:39+5:302015-08-05T00:30:39+5:30
कल्याण (पूर्व) ‘ड’ प्रभाग क्षेत्रअंतर्गत प्र.क्र.५०, शनिनगरमध्ये फेरिवाल्यांसाठी आरक्षण क्र. ४२२ सर्व्हे क्र. ५७ अ पैकी ३० गुंठे जमीन मोकळी असूनही मनपाने ताब्यात
दिवाकर गोळपकर , कोळसेवाडी
कल्याण (पूर्व) ‘ड’ प्रभाग क्षेत्रअंतर्गत प्र.क्र.५०, शनिनगरमध्ये फेरिवाल्यांसाठी आरक्षण क्र. ४२२ सर्व्हे क्र. ५७ अ पैकी ३० गुंठे जमीन मोकळी असूनही मनपाने ताब्यात न घेतल्यामुळे वापर नाही. तसेच मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे शाळेसाठी असलेली आरक्षण क्र. ४१७मध्ये सर्व्हे क्र. १२० पैकी २६ गुंठे असलेल्या जमिनीवर अतिक्रमण होते आहे.
पांडुरंगनगर, जाईबाई मंदिर, हनुमाननगर ते पुनालिंक शेडपर्यंत मलवाहिन्या टाकल्या आहेत. परंतु पुढे चाळींकडे जाणारे रस्ते अरुंद असल्यामुळे मलवाहिन्या टाकण्यात आलेल्या नाहीत. ममता हॉस्पिटल रोड भागात मलवाहिन्या टाकण्यास खाजगी जागा मालकांनी विरोध केला आहे.
प्रभागाची लोकसंख्या १३,५०० असून ५० टक्के चाळी व ५० टक्के इमारतींमध्ये मागासवर्गीय २० टक्के चाळी व ५० टक्के इमारतींमध्ये मागासवगी्रय २० टक्के, उत्तर भारतीय १५ टक्के, दक्षिण भारतीय १० टक्के, ख्रिश्चन ५ टक्के, महाराष्ट्रीय ५० टक्के अशी लोकवस्ती सामावली आहे. योगेश्वर टॉवर, खुशी हाईटस, कैराली पार्क, महासंतोशी कॉम्प्लेक्स, पांडुरंगनगर, हनुमाननगर, जुने पोस्ट आॅफिस व शनिमंदिर परिसर इ. भाग या प्रभागात मोडतो.या प्रभागात सुलभ शौचालय नाही, पण चाळीचाळींमध्ये सेफ्टी टँक आहेत, ज्यांची वेळोवेळी सफाई केली जाते. पांडुरंगनगर, मातृछाया सोसायटीमधील ८ चाळी, सहवास कॉलनी, पारिजात कॉलनी, जगन निवास, वस्त्या पाडा, भागात गटारे बांधली आहेत. हनुमाननगरची गटाबे बंदिस्त करून पदपथ बनवले आहेत.
पुनम अपार्टमेंट ते भगवाननगर नाल्याचे काम व कमला पावशे चाळ, बाळाराम पावशे चाळ गटारांचे काम खाजगी जागा मालकांच्या विरोधामुळे होऊ शकले नाही. जलपरी अपार्टमेंट, लक्ष्मी पॅलेस ते रत्नप्रभा सोसायटी येथील पायवाटांची दुरावस्था आहे. जाईबाई रोडे ते शनिमंदिर रस्ता शनिभक्तांसाठी सिमेंटचा बांधण्यात आला. परंतु त्या रस्त्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. पुणेलिंक रोड ते गावदेव रोड, काटे मानिवली सिमेंटच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. डांबरीकरण झालेल्या रस्त्यांवर खड्डे आहेत. यामुळे पाच वर्षात नगरसेवकांनी केले तरी काय? हा प्रश्न उपस्थित होतो.