आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणे जमीनदोस्त
By Admin | Published: January 24, 2017 05:39 AM2017-01-24T05:39:37+5:302017-01-24T05:39:37+5:30
महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बांधलेले बेकायदा गाळे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने सोमवारी जमीनदोस्त केले.
उल्हासनगर : महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बांधलेले बेकायदा गाळे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या पथकाने सोमवारी जमीनदोस्त केले. या गाळ्यांमध्ये जीन्स कारखाने थाटण्यात आले होते.
शहरातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी प्रभाग अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे चार महिन्यांपासून बेकायदा बांधकामे ठप्प झाली आहेत.
मात्र, कॅम्प नं-५ मधील झुलेलाल प्रवेशद्वाराजवळील भूखंड महापालिका परिवहनसेवेसाठी आरक्षित आहे. त्यावर, पाच ते सहा बेकायदा व्यापारी गाळे बांधण्यात आले असून त्यात जीन्स कारखाने सुरू झाल्याची तक्रार शिंपी यांच्याकडे आली होती. त्याआधारे त्यांनी पोलीस बंदोबस्तात सोमवारी जमीनदोस्त केले. यामुळे एका राजकीय नेत्याच्या अस्तित्वाला धक्का बसल्याची चर्चा परिसरात आहे. (प्रतिनिधी)