खंबाळपाडा आगारातील कचरागाड्या अखेर हटणार

By admin | Published: May 4, 2017 05:42 AM2017-05-04T05:42:48+5:302017-05-04T05:42:48+5:30

केडीएमसीचे दैनावस्थेतील खंबाळपाडा येथील बसआगार विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे या

At the end of the Khambhal Pada Junkyard | खंबाळपाडा आगारातील कचरागाड्या अखेर हटणार

खंबाळपाडा आगारातील कचरागाड्या अखेर हटणार

Next

कल्याण : केडीएमसीचे दैनावस्थेतील खंबाळपाडा येथील बसआगार विकसित करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे या आगारातील कचऱ्याच्या गाड्या हटवल्या जाणार आहेत. मंगळवारी झालेल्या बैठकीत परिवहन समितीचे सभापती संजय पावशे यांनी उपक्रमाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले होते. त्यात बुधवारी सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी विलास जोशी यांनी खंबाळपाडा आगाराला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
केडीएमटी प्रशासनाचे आजवर तिन्ही आगारांकडे पुरते दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दलदलीची आगारे आणि मोडकळीस आलेली दैनावस्थेतील कार्यालये, असे चित्र येथे सर्रासपणे दिसत होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘आॅन दी स्पॉट’द्वारे या एकंदरीतच वास्तवतेला वाचा फोडली होती. त्यानंतर, केडीएमटी उपक्रमाला जाग आली. यात वसंत व्हॅली आगाराचा भूखंड विकसित करणे, खंबाळपाडा आगारात अंतर्गत सुधारणा करणे, याचबरोबर गणेशघाट आगारात लाद्या बसवणे, गटारासाठी व बस थांबण्यासाठी स्टॉपरची व्यवस्था करणे, फर्निचर आणि डांबरीकरण करणे, आदी कामांचे साडेचार कोटींचे प्रस्ताव आॅक्टोबरमध्ये झालेल्या स्थायी समितीच्या सभेने मंजूर केले आहेत. खंबाळपाडा आगार कार्यान्वित करण्यासंदर्भात वारंवार ठराव करूनही त्याला मुहूर्त मिळालेला नव्हता. अखेर, उशिरा का होईना, या आगाराच्या विकासालाही प्रारंभ झाला आहे. परंतु, याठिकाणी कचऱ्याच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. या गाड्या तत्काळ हटवा, असे परिवहन सदस्यांकडून सातत्याने प्रशासनाला सांगूनही याबाबत कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या बस ठेवायच्या कुठे, असा सवाल उपस्थित झाला आहे. वेळप्रसंगी मेट्रो मॉल परिसराचा आधार घ्यावा लागला आहे. खंबाळपाडा आगाराच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने या आगाराला एकप्रकारे डम्पिंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
दरम्यान, परिवहनचे सभापती पावशे यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे आणि अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खंबाळपाडा आगारातील कचऱ्याच्या गाड्या हलवून तेथे डोंबिवली शहरासाठी बस सोडा, असे आदेश दिले. त्यात आगाराच्या विकासाचे काम सुरू असून कचरा गाड्यांमुळे त्या कामांना अडथळा निर्माण होत असल्याकडेही पावशे यांनी लक्ष वेधले. अखेर, त्यानुसार आगारातील कचऱ्याच्या गाड्या हलवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)

शेजारील भूखंडावर हलवणार गाड्या

खंबाळपाडा आगारात कल्याण पूर्वेकडील तीन प्रभागांमध्ये कचरा उचलणाऱ्या ४५, तर डोंबिवलीच्या चार प्रभागांसाठी वापरल्या जाणाऱ्या ६० गाड्या उभ्या केल्या जात आहेत. या आगारातूनच त्या गाड्या सुटत असत.

आगाराला लागूनच असलेल्या भूखंडावर या गाड्या हलवण्याचा निर्णय घेतला गेला असलातरी ती जागा अपुरी पडणार असल्याने गाड्यांच्या पार्किंगचा तिढा ‘जैसे थे’ राहण्याची दाट शक्यता आहे.

Web Title: At the end of the Khambhal Pada Junkyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.