लॉकडाऊन संपताच ठाणे शहरातील गुन्हेगारीमध्येही वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:44 AM2021-09-27T04:44:24+5:302021-09-27T04:44:24+5:30

जितेंद्र कालेकर ठाणे: कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल होताच शहरातील गुन्हेगारीही अनलॉक झाल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात २०२० च्या तुलनेत ...

With the end of lockdown, crime in Thane city also increased | लॉकडाऊन संपताच ठाणे शहरातील गुन्हेगारीमध्येही वाढ

लॉकडाऊन संपताच ठाणे शहरातील गुन्हेगारीमध्येही वाढ

Next

जितेंद्र कालेकर

ठाणे: कोरोनामुळे लावलेले निर्बंध शिथिल होताच शहरातील गुन्हेगारीही अनलॉक झाल्याचे चित्र आहे. ठाणे शहरात २०२० च्या तुलनेत २०२१च्या अवघ्या आठ महिन्यांमध्येच खून, जबरी चोरीसह महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

ठाणे शहरातील परिमंडळ एकमध्ये ठाणेनगर, नौपाडा, कळवा, मुंब्रा, डायघर आणि राबोडी या सहा पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन होते. त्या काळात या परिमंडळात ऑगस्ट २०२० अखेपर्यंत (यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारीत लॉकडाऊन नव्हते) खुनाचे पाच गुन्हे झाले. याउलट, २०२१ मध्ये अवघ्या आठ महिन्यांमध्ये खुनाचे ११ गुन्हे दाखल झाले. खुनाच्या प्रयत्नाचे चार गुन्हे होते. यातही यावर्षी १३ ने वाढ होऊन १७ गुन्हे नोंद झाले.

* सोनसाखळी जबरी चोरीचे दहा, तर इतर जबरी चोरीचे ३० असे ४० गुन्हे गेल्यावर्षी नोंदविले. यात १८ ने वाढ होऊन ही संख्या यावर्षी ५८ झाली. यात २१ सोनसाखळीचे, तर ३७ इतर जबरी चोऱ्यांचा समावेश आहे.

* २०२० मध्ये घरफोडीचे ६०, तर वाहन चोरीचे १४० गुन्हे नोंदविले होते. इतर चोरीचे १०५ गुन्हे नोंद झाले. लैंगिक अत्याचाराचे २१, तर विनयभंगाचेही ५२ गुन्हे होते. अपहरणाचे ९१ गुन्हे दाखल झाले. त्याचवेळी २०२१ मध्ये १०३ (४१ ने वाढ) गुन्हे नोंद झाले. वाहन चोरीमध्येही १३१ ने वाढ होऊन २७१ गुन्हे दाखल झाले. इतर चोरीचेही १३४ दाखल असून यातही २९ वाढ झाली.

* अशीच परिस्थिती परिमंडळ पाच वागळे इस्टेटमधील कोपरी, वागळे इस्टेट, वर्तकनगर, श्रीनगर, कापूरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांमध्येही आहे. २०२० मध्ये ऑगस्टपर्यंत दोन खून, सहा खुनाचे प्रयत्न, २५ सोनसाखळी चोरीचे गुन्हे नोंद झाले. २०२१ मध्ये यात वाढ होऊन खुनाचे सहा, खुनाचा प्रयत्न १६, सोनसाखळी चोरीचे २५ गुन्हे दाखल झाले. लैंगिक अत्याचाराचे आधी २२ गुन्हे होते, ते यावर्षी २७ झाले. विनयभंगाचे ४३ वरून ७२ गुन्हे झाले. यातही २९ ची वाढ झाली.

...............

लॉकडाऊनमुळे लोक कमी बाहेर पडले. व्यवहारही थंडावले होते. पोलीस प्रेझेन्स जास्त होता. आता सर्वसाधारण परिस्थितीमुळे गुन्हे वाढल्याचे दिसत आहे.

अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर.

Web Title: With the end of lockdown, crime in Thane city also increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.