पुण्यात पवारांचे 'ते' विधान अन् ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाचा 'सामना' रंगला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 07:00 PM2021-10-16T19:00:03+5:302021-10-16T19:03:46+5:30

येथील नागरीकांना लस मिळावी म्हणून आम्ही सांगत होते, परंतु कोणीही पुढाकार घेत नव्हता. म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन येथील घराघरात गेलो आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी केली.

At the end of sharad Pawar's statement, NCP-Shiv Sena vs ncp in kalawa thane in front of eknath shinde | पुण्यात पवारांचे 'ते' विधान अन् ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाचा 'सामना' रंगला

पुण्यात पवारांचे 'ते' विधान अन् ठाण्यात राष्ट्रवादी-शिवसेनेत वादाचा 'सामना' रंगला

googlenewsNext
ठळक मुद्देइकडे पुण्यात शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असे विधान केले आहे. तर, तिकडे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् शिवसेनेत सामना रंगल्याचं दिसून आलं आहे.

ठाणे -  कळव्यातील लसीकरणाच्या मुद्यावरुन राष्ट्रवादीने शिवसेनेवर तोफ डागल्यानंतर शिवसेनेने देखील राष्ट्रवादीला कळव्यात जशाच तसे उत्तर दिले आहे. आम्ही श्रेय घेण्याचे किंवा बॅनर फाडण्याचे काम करीत नाही, त्यासाठी मेहनत घ्यावी लागते, कार्यकर्ते घराघरात जावे लागतात, अशा शब्दात शिवसेनेच्या नेत्यांनी कळव्यात डरकाळी फोडली. आम्ही श्रेय घेण्याचे नाही तर श्रेय देण्याचे काम करीत असल्याचा टोलाही ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

इकडे पुण्यात शरद पवारांनी महाविकास आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असे विधान केले आहे. तर, तिकडे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी अन् शिवसेनेत सामना रंगला आहे. कळव्यात आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहीमेच्या माध्यमातून शिवसेना विरुध्द राष्ट्रवादी असा सामना रंगल्याचे दिसून आले. बॅनर फाडल्यावरुन राष्ट्रवादीने शिवसेनेवर आसुड ओढले असतांनाच दुसरीकडे या लसीकरण मोहिमेचा सांयकाळी समारोप होत असतांना याठिकाणी ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश म्हस्के, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महापौर नरेश म्हस्के यांनी राष्ट्रवादी पक्षाचे नाव न घेता त्यांना जशाच तसे उत्तर दिले. 

येथील नागरीकांना लस मिळावी म्हणून आम्ही सांगत होते, परंतु कोणीही पुढाकार घेत नव्हता. म्हणून आम्हीच पुढाकार घेऊन येथील घराघरात गेलो आणि ही लसीकरण मोहीम यशस्वी केली. त्यातही महापालिकेकडून लस उपलब्ध होत असली तरी त्यासाठी लागणारा मंडप, कार्यकर्ते, इतर व्यवस्था करण्याची तयारी देखील तितकीच गरजेचे असते, ते करण्याची हिम्मत मात्र दाखवता आली नसल्याची टिकाही त्यांनी राष्ट्रवादीवर केली. त्यातही घरार्पयत लस पोहचविण्यासाठी कार्यकर्ते हवे, प्रत्येकाच्या घरात आपला कार्यकर्ता जात होता, सकाळी कार्यकर्ते रिक्षा, टॅम्पो ठेवले होते. त्यामुळे लसीकरणासाठी आम्ही श्रेय घेत नाही, श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत नाही. परंतु, हे नागरीकांनीच दिलेले श्रेय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

घरापर्यंत पोहचलो म्हणून काहींना त्रास - डॉ. श्रीकांत शिंदे

कोरोनाची तिसरी लाट रोखायची असेल तर त्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. त्यादृष्टीने प्रत्येक नागरीकार्पयत पोहचणे गरजेचे आहे. परंतु, आम्ही घरार्पयत पोहचलो म्हणूनच काहींना त्रास झाला असल्याची टिका त्यांनी राष्ट्रवादीवर केली. हा त्रास यापुढे आणखी वाढत जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

फाडाफाडीचे काम आम्ही करत नाही - एकनाथ शिंदे

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावेळी राष्ट्रवादीचा समाचार घेत आम्ही बॅनर फाडण्याचे काम करीत नाही, फाडाफाडाची कामे शिवसेना काम करीत नाही, आम्ही श्रेय घेण्याचे काम करीत नाही, तर श्रेय देण्याचे काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, प्रत्येक नगरसेवकाच्या मागणीनुसार लसीकरण मोहीम राबविली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 

Web Title: At the end of sharad Pawar's statement, NCP-Shiv Sena vs ncp in kalawa thane in front of eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.