कळव्यातील संथ मतमोजणीने पाहिला अंत
By admin | Published: February 24, 2017 07:30 AM2017-02-24T07:30:20+5:302017-02-24T07:30:20+5:30
मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणच्या केंद्रांवर जसा याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला, त्याचप्रमाणे
ठाणे : मतदानाच्या दिवशी ठिकठिकाणच्या केंद्रांवर जसा याद्यांचा घोळ पाहण्यास मिळाला, त्याचप्रमाणे कळव्यात मतमोजणी प्रक्रियेवेळीही गोंधळ पाहण्यास मिळाला. ही प्रक्रिया अगदी धीम्या गतीने सुरू होती. तेथे पहिला निकाल जाहीर होण्यासच तीन तास लागले. त्यामुळे दुसऱ्या प्रभागातील उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांना पहिली प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ताटकळत रहावे लागले. कळव्यातून शिवसेनेच्या नऊ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहा आणि एका अपक्षाच्या पारड्यात मते टाकण्यात आली. कळव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या चुरशीच्या लढतीत शिवसेनेने बाजी मारल्याची दिसली. तर, भाजपाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी टपाल असो किंवा प्रत्यक्ष मतदान असो, त्यात केलेला नोटाचा वापर लक्षणीय ठरला.
कळव्यातील ९, २३, २४, २५ या प्रभागांतील मतमोजणी कळव्यातील सरकार विद्यामंदिर येथे पार पडली. तेथे १७ टेबले लावली होती. सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार होती. पण, ती तिला सव्वा ते साडेदहा वाजले. सुरुवातीला टपाली मते मोजली. या वेळी मतदारांनी नोटाला कळ दिली. त्यानंतर, व्होटिंग मशीन उघडण्यात आल्या. ९ नंबरच्या प्रभागातून शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून आले. यात प्रभाग क्रमांक-९ ब मधील शिवसेनेच्या अनिता गौरी व राष्ट्रवादीच्या सुरेखा पाटील यांच्यात चुरस झाली. तीन फेऱ्यांत अनिता गौरी यांनी पाटील यांना मागे टाकून विजय संपादन केला. त्यानंतर, झालेल्या २३ प्रभाग क्रमांकमधील राष्ट्रवादीचे चारही उमेदवार पहिल्यापासून आघाडीवर राहून ते पॅनलही विजयी झाले. प्रभाग २४ मध्ये दोन शिवसेना, प्रत्येकी एक राष्ट्रवादीचे आणि अपक्ष उमेदवार निवडून आले. प्रभाग २५ अ आणि ब मध्ये शिवसेनेचे गणेश साळवी आणि राष्ट्रवादीच्या महेश साळवी तर शिवसेनेच्या मंगल कळंबे आणि राष्ट्रवादीच्या मनाली पाटील यांच्यात झालेल्या चुरशीत महेश साळवी तर मंगल कळंबे यांनी बाजी मारून गेले. असे राष्ट्रवादी तीन तर शिवसेनेचे एक जण निवडून आले आहेत.
या प्रभागांची मतमोजमी सुरू झाल्यापासून दरवेळी चित्र बदलत जाताना गर्दीचा माहोलही बदलत होता. क्षणोक्षणी उत्कंठा वाढत होती. (प्रतिनिधी)