पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 01:52 PM2024-10-28T13:52:56+5:302024-10-28T13:53:47+5:30

वंदे भारत एक्सप्रेससह लांब पल्ल्याच्या गाड्या प्रभावित.

Engine failure of goods train near Kelve Road station on Western Railway Traffic disruption | पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

पश्चिम रेल्वेवरील केळवे रोड स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल; वाहतूक विस्कळीत!

पालघर :- पश्चिम रेल्वेच्या केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन फेल झाल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या गाड्यांवर परिणाम झाला असून, सध्या त्या २० ते २५ मिनिटे उशिराने धावत आहेत.

केळवे रोडजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मालगाडीचे  इंजिन अचानक फेल झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे मुंबईकडे जाणारी वंदे भारत एक्सप्रेस देखील पालघर रेल्वे स्थानकावर थांबून राहिली आहे. तसेच, गुजरातहून येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या देखील पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत.

रेल्वे अधिकाऱ्यांची तत्काळ कारवाई 
घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने केळवे रोड परिसरात दाखल झाले आहेत. फेल झालेल्या मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रेल्वेच्या तांत्रिक पथकाने घटनास्थळी पोहोचून दुरुस्ती प्रक्रिया सुरु केली आहे, ज्यामुळे लवकरच वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

या इंजिन फेलमुळे रेल्वे प्रवाशांना काही काळासाठी त्रास सहन करावा लागला आहे. परंतु रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीप्रमाणे, मालगाडीच्या इंजिनची दुरुस्ती प्रक्रिया गतीने चालू आहे आणि लवकरच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल.

Web Title: Engine failure of goods train near Kelve Road station on Western Railway Traffic disruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :railwayरेल्वे