औरंगाबादमध्ये १६ दिवसांमध्ये कोविड सेंटर उभारणारे अभियंता भूषण हर्षे ठाण्यात रुजू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 01:22 AM2021-08-14T01:22:43+5:302021-08-14T01:30:30+5:30

अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही कार्यकारी अभियंता भूषण हर्षे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.

Engineer Bhushan Harshe, who will set up Kovid Center in Aurangabad in 16 days, will join Thane | औरंगाबादमध्ये १६ दिवसांमध्ये कोविड सेंटर उभारणारे अभियंता भूषण हर्षे ठाण्यात रुजू

ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळात नियुक्ती

googlenewsNext
ठळक मुद्दे ठाण्याच्या औद्योगिक विकास महामंडळात नियुक्तीएसआरएचा प्रकल्प मार्गी लावणार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: औरंगाबादमध्ये अवघ्या १६ दिवसांमध्ये ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर उभारणारे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे हे आता ठाण्यात बदलीने रुजू झाले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ठाणे विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंता पदी त्यांची राज्य शासनाने नुकतीच नियुक्ती केली आहे.
सरळ सेवा पद्धतीने जुलै २०१५ मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळात त्यांची नियुक्ती झाली. महामंडळाच्या लातूर विभागात २०१५ च्या दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने उद्योगांचा पाणी पुरवठा सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी ते प्रयत्नशील होते. जून २०१६ ते २०१८ या दरम्यान धुळे विभागांतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्हयातील उद्योग विकासासाठी तसेच उद्योगासाठी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. पुढे २०१८ ते जुलै २०२१ पर्यंत ते औरंगाबाद येथे कार्यरत होते. याच काळात औरंगाबाद येथे नवीन ७२ दशलक्ष घन मीटर इतकी प्रती दिन पाणी पुरवठा योजना त्यांनी कार्यान्वित केली. याशिवाय, ३१ मेट्रिक टन प्रति दिन क्षमतेचे अघातक कचरा संकलन, उपचार विल्हेवाट आणि व्यवस्थापन सयंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. कोविड काळात महामंडळातर्फे ५० टक्के आॅक्सिजनची व्यवस्था असलेले ३०० खाटांचे सुसज्ज असे कोविड केअर सेंटर वैद्यकीय उपकरणांसह तयार करुन त्यांनी ते महापालिकेला सुपूर्द केले. अल्पावधीत रुग्णालयाची उभारणी केल्याबद्दल उद्योगमंत्री देसाई यांनीही त्यांचे विशेष कौतुक केले होते. ठाणे विभागातील वागळे इस्टेट, तारापूर आणि अंधेरीचे कार्यक्षेत्र त्यांच्याकडे असून अंधेरीतील एसआरए प्रकल्प येत्या काही दिवसांमध्ये मार्गी लावण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलतांना व्यक्त केला.

Web Title: Engineer Bhushan Harshe, who will set up Kovid Center in Aurangabad in 16 days, will join Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.