एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी नोंदी, पोलिसांची वाढतेय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2019 01:32 AM2019-04-14T01:32:10+5:302019-04-14T01:32:15+5:30

चोरीस गेलेली वस्तू पटकन मिळावी, यातून काही डोकेबाज तक्रारदारांनी नवा फंडा अवलंबला आहे.

Enlargement of the police and police headquarters | एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी नोंदी, पोलिसांची वाढतेय डोकेदुखी

एकाच गुन्ह्याची तीन ठिकाणी नोंदी, पोलिसांची वाढतेय डोकेदुखी

Next

- पंकज रोडेकर

ठाणे : चोरीस गेलेली वस्तू पटकन मिळावी, यातून काही डोकेबाज तक्रारदारांनी नवा फंडा अवलंबला आहे. चोरीच्या एक नव्हे, तर दोन किंवा तीन पोलीस ठाण्यांत त्यांनी तक्रारी दाखल केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या नाहक वाढत असल्याने पोलिसांसाठी ही नवीन डोकेदुखी होऊन बसली आहे.
मोबाइल किंवा पर्सचोरीसारख्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आपली वस्तू लवकर मिळण्यासाठी तक्रारदारांनी रेल्वे पोलीस ठाण्यांसह शहर तसेच ग्रामीण पोलीस दलाकडे तक्रारी दाखल करण्याचे उपदव्याप सुरू केले आहेत. अशा प्रकारे काही तक्रारी दाखल झाल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.
पोलीस दलात आता गुन्हे आॅनलाइन एफआयआरद्वारे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आरोपींची यादी एका क्लिकवर मिळणे शक्य झाले आहे. मात्र, आता एकाच प्रकरणाच्या तक्रारी वेगवेगळ््या पोलीस ठाण्यांमध्ये करण्याचे प्रमाण वाढल्याने, आरोपींप्रमाणेच तक्रारदारांची माहितीही एका क्लिकवर मिळावी, त्यासाठी आॅनलाईन एफआयआर प्रणालीत बदल करावेत, अशी मागणी पोलीस दलातून होऊ लागली आहे. हे बदल झाल्यास डवेगवेगळ्या ठिकाणी तक्रार देण्यासाठी तक्रार गेल्यास त्याची माहिती पोलिसांना लगेच मिळेल. त्यातून पोलिसांना नाहक होणारा मनस्ताप टाळता येईल, असे मत काही पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
>एका मोबाइलचोरीच्या
दोन तक्रारी
एक व्यक्तीने मोबाइल फोन चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यासह रेल्वे पोलीस ठाण्यातही दाखल केली आहे. यामध्ये संबंधित तक्रारदारास त्यांचा मोबाइल रेल्वेत नेमका कुठे चोरीला गेला आहे, हे पाहण्यासाठी त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी चला, असे सांगितल्यावर तक्रारदार वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करत होता. चौकशी केली असता त्याने दोन ठिकाणी तक्रारी दिल्याचे समजले.
>पर्समधील दागिने
चोरीच्या तीन तक्रारी
एका प्रवासी महिलेचे प्रवासात दागिने चोरीला गेले. त्या चोरीच्या वेगवेगळ्या दोन रेल्वे पोलीस ठाण्यांत आणि ती महिला राहत असलेल्या स्थानिक पोलीस ठाण्यातही तिने तक्रार दाखल केल्याची बाब पुढे आली आहे. ही तक्रार चोरीला गेलेले दागिने लवकर मिळावेत, या उद्देशाने केल्याचेही उघड झाल्याचे एका पोलीस अधिकाºयाने सांगितले.

Web Title: Enlargement of the police and police headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.