मराठी माध्यमाच्या शाळेतूनच बुद्धीला मिळते चालना

By Admin | Published: May 12, 2017 01:28 AM2017-05-12T01:28:08+5:302017-05-12T01:28:08+5:30

आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी मेंदूचा वापर केला जातो. बुद्धीला चालना देणारे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून मिळते.

Enlightenment is gained from Marathi medium school | मराठी माध्यमाच्या शाळेतूनच बुद्धीला मिळते चालना

मराठी माध्यमाच्या शाळेतूनच बुद्धीला मिळते चालना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आपल्या बुद्धीला चालना देण्यासाठी मेंदूचा वापर केला जातो. बुद्धीला चालना देणारे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेतून मिळते. हे शिक्षण हृदयापासून दिले जाते. त्यामुळे ते विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या तऱ्हेने पोहोचते. मराठी शाळांची संख्या वाढली पाहिजे, असे मत मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त के ले.
राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा उद्घाटन समारंभ सोमवारी दत्तनगर येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात झाला. या वेळी डॉ. देशमुख बोलत होत्या. शाळेची वेबसाइट व आर्यभट्ट गणितीय प्रयोग शाळेचे उद्घाटनही या वेळी झाले. याप्रसंगी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, संस्थेच्या अध्यक्षा सुलभा डोंगरे, कार्यवाह संजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. देशमुख म्हणाल्या, की स्वामी विवेकानंद ही शाळा चार मुलांपासून सुरू झाली. अनेक शिक्षकांनी योगदान दिले म्हणूनच इतके विद्यार्थी आपण घडवू शकलो. या शाळेत ३० वर्षे शिकवून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. इतकी वर्षे या व्यवसायात राहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसणे सोपे नाही. कीर्तन हा माझ्या आवडीचा विषय आहे. कीर्तन आणि प्रवचनातून अनेक गोष्टी शिकता येतात. जे शिक्षण शाळेतून मिळत नाही, ते कीर्तनातून मिळते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये दिले जाणारे शिक्षण हे मनापासून व विद्यार्थ्यांच्या प्रतिमेला वाव देणारे आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थी स्पर्धेत कधी मागे राहणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.
रांगोळीची प्रथा आता कमी होऊ लागली आहे. रांगोळीला आपल्या संस्कृतीमध्ये महत्त्व आहे. एका मैत्रिणीच्या घरी गेल्यावर तिने शेगडीच्या भोवतीने रांगोळी काढली होती. त्याबाबत विचारला असता त्यांनी सांगितले की, रांगोळी काढल्याने शेगडी स्वच्छ होते. असे चांगले विचार मराठी शाळा देतात. हल्ली रांगोळी कुठे दिसत नाही. रांगोळीची जागा आता पेंटिंगने घेतली आहे. विवेकानंदांनी अनेक आध्यात्मिक संदेश दिले. त्या मार्गावर तुम्ही चालत आहात. त्यामुळे तुमची उत्तरोत्तर प्रगतीच होणार आहे. शाळा मोठी करूया. राष्ट्राला पुढे आणूया. राष्ट्र हे युवकांवर अवलंबून असतात. विद्यार्थ्यांनी प्रगती करताना माणुसकी विसरू नका, असा संदेश ही त्यांनी दिला.
राज्यमंत्री चव्हाण म्हणाले, शाळा हे आदर्श नागरिक घडवणारी संस्था आहे. त्यागाच्या भावनेतून अनेकांनी मेहनत घेतल्याने संस्था नावारूपास आली. विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना प्रोत्साहन दिले जाते. तसेच सावरकरांचे विचार व विवेकानंदाची शिकवण विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवली जाते. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सातासमुद्रापार लैकिक मिळवला आहे. डोंबिवलीच्या मातीतही अनेक रत्ने जन्मला आली आहेत. त्यामुळे डोंबिवलीचे नाव झाले आहे. शाळेतील शिक्षक व संस्थेचे पदाधिकारी यांचे योगदान आहे. त्यामुळे चांगले क्रीडापटू, डॉक्टर या देशाला मिळाले आहेत. मराठी शाळा ओस पडत चाललेल्या आहेत. पण येथील मराठी शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेत आहेत. कारण येथील शिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे, म्हणूनच हे शक्य झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
सुलभा डोंगरे यांनी पुढील वर्षभर विविध उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कुलकर्णी व सूत्रसंचालन सुनील पांचाळ यांनी केले. माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, नगरसेवक राजेश मोरे, संदीप पुराणिक, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, अलका मुतालिक आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

Web Title: Enlightenment is gained from Marathi medium school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.