तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 06:51 PM2019-05-15T18:51:13+5:302019-05-15T18:52:42+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी 

Enter a criminal case against Eagle Construction due to the death of the youth | तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करा 

तरूणाच्या मृत्यूस कारणीभूत इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करा 

Next
ठळक मुद्दे इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली आहे. या अपघातात सचिन काकोडकर यांचा मृत्यू झाला आहे.

ठाणे - बुधवारी सकाळी मुल्ला बाग येथे इगल कन्स्ट्रक्शनने नवीन ड्रेनेज लाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका इसमाचा अपघातीमृत्यू झाला आहे. सुरक्षेची कोणतीच यंत्रणा न वापरता हे खोदकाम करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.  त्यामुळे सदर काम करणाऱ्या इगल कन्स्ट्रक्शनवर सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे आणि प्रदेश सरचिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली आहे. 

मुल्ला बाग बस डेपोजवळ इगल कन्स्ट्रक्शनद्वारे नवीन ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खड्डा खोदण्यात आला होता. मात्र या खड्ड्यात कार कोसळल्याने अपघात झाला. या अपघातात सचिन काकोडकर यांचा मृत्यू झाला आहे. सचिन काकोडकर हे त्यांची मारूती सुझुकी अर्टीका गाडी निलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे सकाळी घेऊन जात होते. त्याचवेळी मुल्ला बाग बस डेपोजवळ ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात त्यांची गाडी पलटी झाली. अशा प्रकारे खोदकाम सुरू असलेल्या  ठिकाणी बॅरीकेट्स उभारणे सक्तीचे केले आहे.  तरीही संबधित ठेकेदाराने ते उभारले नाहीत.  निविदामधील अटीशर्तीनुसार सुरक्षेसाठी करावयाच्या उपाययोजनांकडे ठेकेदाराने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.  तसेच उत्खननातून निघालेली माती रस्त्यावर इतस्ततः पसरली असतानाही त्याची विल्हेवाट (बॅक फिलींग) लावण्यात आली नाही.  त्यामुळेच काकोडकर यांची कार मातीवरून घसरून खड्ड्यात पडली. या अपघाताला सदर ठेकेदार तसेच या कामकाजावर देखरेख ठेवणारे पालिकेचे  अधिकारीदेखील जबाबदार आहेत.  त्यामुळे ठेकेदारासह संबधित अधिकाऱ्यांवर  सदोष मनुषवधाचा गुन्हा दाखल करावा, मृत काकोडकर यांच्या कुटुंबियांना अर्थसाह्य करावे , अशी मागणी परांजपे आणि मुल्ला यांनी केली आहे.

Web Title: Enter a criminal case against Eagle Construction due to the death of the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.