उत्साहात रंगली पापड रेसिपी क्वीन स्पर्धा, विजया महाडिक ठरल्या पापडक्वीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 06:41 AM2018-02-02T06:41:36+5:302018-02-02T06:41:46+5:30
वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात.
ठाणे : वन मिनिट गेम शो, आॅन द स्पॉट पापड रेसिपीचे प्रात्यक्षिक, पापडापासून बनवलेल्या विविध लज्जतदार रेसिपी स्पर्धा आणि या सगळ्याला सखींनी दिलेला भरभरून प्रतिसाद... असे उत्साही वातावरण पाहायला मिळाले, ते बुधवारी ठाण्यात. निमित्त होते, ‘लोकमत सखी मंच आणि रामबंधू’ आयोजित पापड रेसिपी क्वीन स्पर्धेचे. प्रसिद्ध अभिनेत्री सुरूची अडारकर हिच्या उपस्थितीने या कार्यक्रमाला अधिक रंगत आली.
वसंतराव नाईक सभागृह येथे हा कार्यक्रम उत्साहात रंगला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर, अभिनेत्री सुरूची अडारकर (डॉ. अंजली) हिच्याशी गप्पांचा कार्यक्रम रंगला. नंतर, फूड फूड टीव्ही फेम नामवंत शेफ शंतनू गुप्ते यांनी सखींना पापड नूडल्स स्प्रिंग रोल, पापड पनीर फ्री टर्सची रेसिपी करून दाखवली. त्याचबरोबर सखींना साध्यासोप्या कुकिंग टिप्स दिल्या. उपस्थित सखींना रामबंधूतर्फे पापड रेसिपी बुकचेही वाटप करण्यात आले. याचदरम्यान पापड शब्द वापरून सखींसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. सखींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन उखाणे सादर केले.
पापड रेसिपी स्पर्धेत सुमारे ५० सखींनी सहभाग घेतला होता. यात पापड पराठा, पापड चाट, पापड कचोरी चाट, पापड समोसा, पापड पिझ्झा, पापड लाडू, पापड चॉकलेट रोल्स, पापड सॅण्डवीच असे चटकदार पदार्थ तयार करून आणले होते. या स्पर्धेचे परीक्षण गौरी गुजर आणि शंतनू गुप्ते यांनी केले. या स्पर्धेत पाच विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
यावेळी रामबंधूचे मार्केटिंग मॅनेजर भानुदास गुंडकर, जनरल मॅनेजर सेल्स संजीव निगम, मुंबईचे रिजनल मॅनेजर श्रीकांत तिवारी, विभागीय सेल्स अधिकारी सुरेश सनस, अरुण राणे तसेच रामबंधूचे स्थानिक विक्रेते किरण मुदाले (शिवतेज एंटरप्रायजेस) उपस्थित होते. कुणाल रेगे यांनी खुमासदार शैलीत निवेदन केले.
गप्पा डॉ. अंजलीशी
च्मराठीमध्ये पहिल्यांदाच डॉक्टर या क्षेत्राशी निगडित असलेल्या मालिकेसाठी माझी निवड झाल्याचा मला आनंद आहे. आपण अनेकदा डॉक्टर्सना नावं ठेवतो. त्यांच्या कामावर शंका उपस्थित करतो, मात्र आता ती भूमिका करताना डॉक्टरांच्या जबाबदारीची मला जाणीव झाली, असे मत डॉ. अंजली अर्थात सुरूचीने व्यक्त केले.
च्अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयाला आईवडिलांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. या क्षेत्रात पैसा, ग्लॅमर सगळं असलं तरी खूप मेहनत करावी लागते. कधीकधी तर आम्ही सलग दोनतीन दिवस सेटवरच शूटिंगमध्ये व्यस्त असतो, असे अनुभव तिने सांगितले.
च्कोणतीही कला जोपासताना वयाचा विचार करू नका. गृहिणींकडे अनुभव आणि पुरेसा वेळ असतो. ती कर्तव्यदक्ष असते, तत्पर असते. त्यामुळे एखाद्या सखीने ठरवले तर ती कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकते. फक्त योग्य निर्णय घ्या आणि मेहनत करा, असा सल्ला तिने उपस्थित सखींना दिला.