विज्ञान स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील ५० शाळांमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग
By सुरेश लोखंडे | Published: February 7, 2023 06:05 PM2023-02-07T18:05:31+5:302023-02-07T18:06:01+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा आज घेतल्या असता त्यात जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञानाची आवड उघड केली.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व स्पर्धा आज घेतल्या असता त्यात जिल्ह्यातील तब्बल ५० शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन विज्ञानाची आवड उघड केली.
काैसा येथील सिम्बॉयसिस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्श् न व स्पर्ध्ेचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते पार पडले. यावेळी शिक्षणाधिकारी ललीता दहितुले, शिक्षण संस्थेचे कार्यकारी संचालक कमलराज देव, विस्तार अधिकारी मधुकर घोरड, कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्नेहलता देव, परीक्षक प्राध्यापक कैलास देसले, डॉ. अंजली जाधव आणि विद्यार्थी उपस्थित हाेते.
विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध नाविन्यपूर्ण विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनाच्या माध्यमातुन प्रदर्शित करण्यात आले. या शैक्षणिक वर्षातील या ५० व्या विज्ञान प्रदर्शनाला विदयार्थ्यांनीही उत्स्फुर्त प्रतिसाद देत सहभाग घेऊन आपले विज्ञान प्रकल्प प्रदर्शनात मांडले. त्यास अनुसरून ‘विज्ञान दृष्टीकोन नेहमी बदल समोर आणतो आणि आपल्याला बदलण्यास प्रवृत्त करतो. अंधश्रद्धेपासून दुर ठेवतो म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कायम प्रयत्नशील असणे आवश्यक आहे,असे सखाेल मार्गदर्शन जिंदल यांनी विद्यार्थ्यांना केले.