भिवंडी मनपाच्या अमृत कलश यात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्द प्रतिसाद
By नितीन पंडित | Published: September 22, 2023 06:38 PM2023-09-22T18:38:56+5:302023-09-22T18:39:09+5:30
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमानिमित्त भिवंडी मनपाच्या वतीनेच्या अमृत कलश यात्रेचे आयोजन मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी करण्यात आले होते.
भिवंडी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमानिमित्त भिवंडी मनपाच्या वतीनेच्या अमृत कलश यात्रेचे आयोजन मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी करण्यात आले होते. ही कलश यात्रा प्रभाग समिती ५ मधील म्हाडा कॉलनी आरोग्य केंद्र येथून सुरू होऊन जीत हॉस्पिटल, कोळेकर चौक,गोकुळ नगर, राणी सती मंदिराच्या परीसरातून,मनपा भांडारगृह, रामदूत बिल्डींग मार्गे छ.शिवाजी महाराज चौक येथे या कलश यात्रेचा समारोप करण्यात आला. या वेळी पालिका अतिरीक्त आयुक्त विठ्ठल डाके यांनी उपस्थित नागरिकांना पंचप्रण शपथ दिली.
या प्रसंगी पालिका उपायुक्त दिपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोगे, सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बाळाराम जाधव,मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ .बुशरा सय्यद,निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त नितीन पाटील यांच्यासह मनपा अधिकारी,कर्मचारी व नागरिक तसेचएन.सी.सी.,एन. एस. एस. विद्यार्थी, महिला बचत गट प्रतिनिधी,भाजीपाला संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अमृत कलश यात्रेत मनपा शाळेतील शिक्षिका पारंपारिक वेशभूषा करून सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक वाद्य, सनई वाजवत या अमृत कलश यात्रेची सुरवात केल्याने हि यात्रा नागरिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरली होती.या कलश यात्रेमध्ये स्थानिक नागरिकांनी आपल्या घराजवळील माती अमृत कलशात टाकून या राष्ट्रीय उत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.
यावेळी इंडीयन स्वच्छता लीग २.० व स्वच्छता अभियान कार्यक्रम देखील या उपक्रमात घेण्यात आला.अमृत कलश यात्रा मार्गावर पालिका कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली व स्वच्छता विषयक जनजागृती करत पर्यावरण रक्षण, पर्यावरण पुरक वृक्ष लागवड याबाबत पर्यावरण रक्षणाची हरीत शपथ देखील घेण्यात आली.