उल्हासनगर शहरातील संपूर्ण रस्ते दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे होणार  

By सदानंद नाईक | Published: July 7, 2023 04:37 PM2023-07-07T16:37:00+5:302023-07-07T16:37:14+5:30

रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी ५ कोटी, शहरातील ७० टक्के रस्ते सिमेंटकाँक्रीटची असून यावर्षी मुख्य ७ रस्त्या रस्त्याची बांधणी झाल्यावर शहरातील ८० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहे.

Entire roads in Ulhasnagar city will be made of cement concrete in two years | उल्हासनगर शहरातील संपूर्ण रस्ते दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे होणार  

उल्हासनगर शहरातील संपूर्ण रस्ते दोन वर्षात सिमेंट काँक्रीटचे होणार  

googlenewsNext

उल्हासनगर : शहरातील रस्त्यातील खड्डे भरण्यासाठीं महापालिका आयुक्तांनी ५ कोटीच्या निधीची तरतूद करून प्रभाग समिती निहाय्य खड्डे भरण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संदिप जाधव यांनी दिली. संततधार पाऊस सुरू असल्याने, दगडी खडी, रेती, मातीने तात्पुरत्या स्वरूपात खड्डे भरण्यात येत असून त्यानंतर रस्त्याची दुरुस्ती करण्याचे संकेत बांधकाम विभागाने दिली आहे.

 उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी रस्त्यातील खड्डे न भरल्याने रस्त्याची दुरावस्था झाल्याचे चित्र शहरात आहे. रस्त्यातील खड्डे भरण्याची मागणी सर्वस्तरातून झाल्यावर, महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटीच्या निधीची तरतूद केली. पावसाळा सुरू असल्याने, खडी दगड, रेती व मातीने रस्त्यातील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येत आहे. पावसाने उजाड देताच, रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता संदीप जाधव यांनी दिली. तसेच एमएमआरडीएच्या १६० कोटीच्या निधीतून ७ मुख्य रस्ते।बांधणीला मंजूर।मिळाली असून त्यापैकी २ रस्त्याचे कामे सुरू झाली. तसेच शासनाच्या ४६ कोटीच्या मूलभूत सुविधेच्या निधीतूनही कामे सुरू झाल्याचे जाधव यांनी सांगितले. 

शहरातील ७० टक्के रस्ते सिमेंटकाँक्रीटची असून यावर्षी मुख्य ७ रस्त्या रस्त्याची बांधणी झाल्यावर शहरातील ८० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटचे होणार आहे. तसेच महापालिकेच्या वतीने दरवर्षी सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर २० कोटी पेक्षा जास्त निधी खर्च केला जात असून येत्या दोन वर्षात संपूर्ण रस्ते सिमेंटकाँक्रीटचे करण्याचा मानस महापालिका आयुक्त अजीज शेख यांनीं व्यक्त केला. त्यादृष्टीने शहरात कामे सुरू झाल्याचें आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी सांगितले.

Web Title: Entire roads in Ulhasnagar city will be made of cement concrete in two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.