उल्हासनगर महापालिकेकडून प्रवेश उत्सव कार्यक्रम
By सदानंद नाईक | Published: June 19, 2023 07:52 PM2023-06-19T19:52:28+5:302023-06-19T19:52:54+5:30
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या उपलेखाधिकारी निलम कदम यांनी केले.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेत सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उल्हासनगर महापालिका शिक्षण मंडळा अंतर्गत मराठी, हिंदी व गुजराती माध्यमाच्या एकून २२ शाळा चालविल्या जात असून शाळेत साडे चार हजारा पेक्षा जास्त विद्यार्थी धडे गिरवीत आहेत. सन-२०२३-२४ या शैक्षणिक वर्षात प्रवेश उत्सवाची सुरवात शिक्षण मंडळाने जोमात केली. या कार्यक्रमाला आयुक्त अजीज शेख यांचे मार्गदर्शन केले असून यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, प्रशासन अधिकारी अशोक मोरे आदीजन उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन मंडळाच्या उपलेखाधिकारी निलम कदम यांनी केले.
महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी महापालिका शाळेतून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा बाबत तसेच महापालिका शाळेचा दर्जा कसा उंचावेल आदींची माहिती दिली. उपायुक्त सुभाष जाधव यांनी शासनातील अनेक अधिकारी हे सरकारी शाळेत शिकुनच पुढे अधिकारी पदावर कसे गेले. याबाबतची माहिती दिली. यावेळी आयुक्तासह सर्वांनी मुलांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक, समग्र शिक्षा विभागाचे सर्व साधनव्यक्ती, शिक्षण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन वाबळे यांनी केले.