पर्यावरण दक्षता मंडळाचा “आपलं पर्यावरण” - लघु चित्रपट महोत्सव - २०१८ संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2018 04:40 PM2018-06-06T16:40:55+5:302018-06-06T16:40:55+5:30
समाजातील सर्व स्तरांतील पर्यावरणवादी लोकांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी ५ जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २ जून ते ५ जून या कालावधीत पर्यावरण लघुचित्रपट महोत्सवाचे अयोजन केले होते.
ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आयोजित लघु चित्रपट सोहळा-२०१८ उदघाटन समारंभ आज टाऊन हाँल, ठाणे (प). येथे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते पार पडला.
प्रा. विद्याधर वालावलकर यांनी आपलं पर्यावरण लघु चित्रपट महोत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. यानंतर जिल्हाधिकारी डॉ. कल्याणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मिलिंद दामले यांचे चित्रपट रसग्रहण या विषयावर व्याख्यान झाले. दुपारी अरविंद सुळे यांची नखचित्र या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यात १२ जण सहभागी होते. यात अरविंद सुळे यांनी वेगवेगळ्या वन्यप्राण्यांची चित्रे नखांनी काढायला शिकवले. त्यानंतर रुपाली शाईवाले यांनी “आपल पर्यावरण - चित्रपट महोत्सव” या पहिल्या सत्राला सुरुवात केली. यात शाईवाले यांनी आपल पर्यावरण चित्रपट महोत्सव घेण्यामागील ९ हेतू सांगितले. या सत्रात शहरी परीसंस्था, मुंबईचे तटरक्षक, River - A Fairy Tale, Terrorist, I am modi, sihagad, स्वच्छाग्रही, सुरक्षित भविष्य, Ankur, Episode हे चित्रपट दाखविण्यात आले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशाची सुरवात सकाळी निसर्ग भ्रमंतीने मानपाडा निसर्ग परिचय केंद्र, ठाणे येथून झाली. या निसर्ग भ्रमंतीसाठी डॉ. मंगला बोरकर, वनस्पती तज्ञ व चिन्मय खानोलकर, प्राध्यापक सोमैया महाविद्यालय यांनी मार्गदर्शन केले. यात तिथे असलेल्या जैवविविधतेचे महत्व सांगितले. त्यात विविध वनस्पती, पक्षी कीटक यांची माहिती देण्यात आली. या सत्रासाठी ४५ जण हजर होते. मानपाडा येथेच मानव व वन्यजीव संघर्ष कि सहजीवन या विषयावर चर्चासत्र घेण्यात आले. हे चर्चासत्र डॉ. जितेंद्र रामगावकर, पवन शर्मा, संजय जोशी, विद्याधर वालावलकर याच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या चर्चासत्रात जंगलाजवळील लोक वस्ती वाढल्यामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांना त्यांचे भक्ष सहजासहजी मानवी वस्तीत उपलब्ध होते, म्हणूनच त्यांच्या मानवी वस्तीत वावर वाढला आहे आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली आहे असे चर्चासत्रात वाढले गेले आहे. यानंतर कागदी पिशवी बनवण्याची कार्यशाळा टाऊन हाँल, ठाणे (प). येथे सुवर्णा बंगे यांनी घेतला. या कार्यशाळेत १३ जण हजर होते. सर्वजणांनी खूप सुंदर कागदी पिशव्या बनवल्या. “आपल पर्यवरण - चित्रपट महोत्सव” सुरभी वालावलकर व संगीता जोशी यांनी घेतला. या सत्रात स्वच्छता वेंगुर्ला पॅटर्न, कॅरी बॅग, भूमी दिन, स्वच्छाग्रह, अ कॉल इन द रेनफॉरेस्ट, पश्चिम घाट भारताची अर्थ वाहिनी हे लघु चित्रपट दाखवण्यात आले. ४ जून २०१८ रोजी सकाळी ०७.०० वाजता शहीद बाग येथील सिद्धेश्वर तलाव येथे तलाव भ्रमंती ची सुरुवात झाली. या तलाव भ्रमंतीला पौर्णिमा शिरगावकर, सुरभी वालावलकर यांनी नियोजन केले. अनिल कुंटे यांनी तलावाच्या आसपास दिसणारे पक्षी या बाबत माहिती सांगितली. तेथे तांबट, parakit, robin अश्या पक्ष्यांचे दर्शन तेथे घडले. त्यानंतर मयुरेश भडसावळे (तलाव संस्थापक) यांनी सिद्धेश्वर तलावाबाबत माहिती सांगितली. या तलावाला ऐतिहासिक वारसा आहे. या तलावात काही वर्षांपूर्वी ब्रम्हदेवतेची मूर्ती सापडली. हे तलाव Natural Depression मधून तयार झाले. जश्या जश्या वैयक्तिक सुविधा मिळाल्यामुळे पाण्याचा दुष्काळ भासू लागला आहे. यानंतर अंजना देवस्थळे कचराळी तलावाच्या आसपास असणारी झाडांची माहिती सांगितली. त्यात करवंद, कदंब, कडुलिंब, बदाम यांसारख्या झाडांची ओळख करून दिली. या कार्यक्रमासाठी १२ जण उपस्थित होते. मकरंद जोशी पर्यटन तज्ञ आणि आत्माराम परब पर्यटन तज्ञ यांच्या सोबत निसर्ग पर्यटन या विषयावर चर्चासत्र रवींद्र साठे यांच्या समन्वये घेण्यात आले. या चर्चा सत्रात जोशी म्हणाले कि, शेतकी पर्यटन हा निसर्ग पर्यटनाचा भाग असून तेथे शेतीचा अनुभव घेता येतो. तसेच रोजगार व पर्यटन एकमेकांना जोडलेले आहे. आणि रोजगार निर्मिती करायची असल्यास निसर्ग पर्यटनातील धोके ओळखून करावा असा सल्ला दिला. परब यांनी नागालँड, लडाख येथील अनुभव सांगून निसर्ग पर्यटनामध्ये लहान टूर्स प्रभावी काम करतात. मधुमाशी पालन या विषयावर पाटील मार्गदर्शन केले. त्यात ते म्हणाले कि, मधुमाशी फक्त मधनिर्मिती साठी नसून परागीभवनासाठी उपयोगी आहेत. या सत्रात त्यांनी मधुमाशी पालनाची पेटीचा वापर कसा करावा हे सर्व सहभागी यांना सांगितले. कविता वालावलकर यांनी चित्रपट महोत्सव याची सुरुवात केली. या सत्रात पुत्र अवनीचा, कुरुम्बास, wild meat trial, नागझिरा, vanishing vulture, Just another death या लघुचित्रपट दाखविण्यात आले. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ग्राहक आणि पर्यावरण या विषयावर शिरीष देशपांडे (वकील आणि कार्याध्यक मुंबई ग्राहक पंचायत ) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाची सुरुवात सुरभी वालावलकर यांनी केली. देशपांडे - रौप्य महोत्सव, ठाणे, पर्यावरण कार्यक्रम पुन्हा सुरु करु, असे सांगितले. आजचा विषय पर्यावरण व ग्राहंक, दोन्ही कायदे १९८६ मध्ये मंजूर झाले. Beat the Plastic pollution, यानुसार जागतिक स्तरावर जगातील एक देश यजमान असतो तो यावर्षी भारत आहे. कापडी पिशवी धान्यासाठी वापरली तर नक्की पर्यावरण वाचू शकते. यात खरेदी कश्या प्रकारे करावी या बद्दल मार्गदर्शन केले. तसेच वेळास येथील कासव महोत्सवाची माहिती मोहन उपाध्ये समन्वयक सह्याद्री कासव मित्र संस्था यांनी सांगितली. तेथे काही व्यवसायाच्या दुष्टीने कासवाची अंडी विकली जात असत, पण यावर तोडगा म्हणून या संस्थेने एकत्र येवून तेथील ग्रामाथांच्या जोडीने तेथे रोजगार उपलब्ध करून दिला व मोठ्या प्रमाणावर होणारी कासवाची तस्करी संपुष्ठात आणली. राष्ट्रगीताने “आपल पर्यावरण लघु चित्रपट” महोस्तवाची सांगता करण्यात आली.