भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2018 06:04 AM2018-07-15T06:04:00+5:302018-07-15T06:04:09+5:30

शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.

The epicenter of the earthquake in Raigad, warning of alertness to villagers | भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

भूकंपाचा केंद्रबिंदू रायगडमध्ये, दरडप्रवण गावांना सतर्कतेचा इशारा

Next

अलिबाग/ठाणे : शुक्रवारी रात्री ९.२१ वाजता कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरांतील नागरिकांना भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे ऐन पावसात रहिवासी घर सोडून रस्त्यावर आले. या भूकंपाचा केंद्र बिंदू रायगड जिल्ह्यात असून तो २.८ रिश्टर स्केल इतका नोंदवला गेला आहे.
पाऊस सुरू असतानाच भूगर्भात आवाज होऊन काही नागरिकांना हादरे बसले. रात्री उशिरापर्यंत या भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणे शक्य झाले नाही. मात्र, या भूकंपाची खात्री करून घेण्यासाठी दिल्लीच्या भूकंपदर्शक विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी दुजोरा दिला. २.८ रिश्टर स्केल असलेला भूकंप महाराष्टÑातील रायगड जिल्ह्यात झाल्याचे दिल्ली येथील भूकंपदर्शक विभागातील एस.आर. पॉल यांनी लोकमतला सांगितले. रायगडमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील कोणलाच त्याची अधिकृत माहिती मिळत नव्हती. यामुळे शुक्रवारी उशिरापर्यंत भूकंपाविषयी तर्कवितर्क सुरू होते.
तर, रायगड जिल्ह्याला शुक्र वारी रात्री ९.३०च्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे जिल्ह्यात जीवित वा मालमत्तेची हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि, भूकंप हादऱ्यांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दरडप्रवण गावात अधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी प्रशासकीय यंत्रणेला दिले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री रायगड, ठाणे व डोंबिवली, कल्याण परिसराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याचे केंद्र १९.१ उत्तर अक्षांश, ७३.२ पूर्व रेखांश, पाच कि.मी. खोलवर होते. हे धक्के २.८ रिक्टर स्केल तीव्रतेचे होते.
रायगडचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाºयांकडून आढावा घेतला. जिल्ह्यातील दरडप्रवण गावांमध्ये अधिकाºयांनी अधिकाधिक सतर्कता बाळगावी, असे निर्देशही देण्यात आले आहेत.
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यात १०३ गावे दरडप्रवण आहेत. धोक्याच्या पातळीनुसार जिल्ह्यातील नऊ गावे ही वर्ग-१ (अतिधोकेदायक), ११ गावे वर्ग-२ मध्ये तर उर्वरित ८३ गावे ही वर्ग-३ श्रेणीत समाविष्ट करण्यात आली आहेत.
>तालुकानिहाय दरडप्रवण गावे
महाड -४९, पोलादपूर -१५, रोहा -१३, म्हसळा-६, माणगाव - ५, तर सुधागड, खालापूर, कर्जत, पनवेल प्रत्येकी ३, श्रीवर्धन २ आणि तळा तालुक्यात १ अशी एकूण १०३ गावे दरडप्रवण आहेत.
मे महिन्यातच प्रशासनाने या गावांतील ५१५ गावकºयांना प्रशिक्षित केले आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकाºयांनी आपापल्या क्षेत्रातील दरडप्रवण गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.

Web Title: The epicenter of the earthquake in Raigad, warning of alertness to villagers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.