रस्त्यांच्या कामात आढळली त्रुटी; आयुक्त बांगर यांनी केली अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई

By अजित मांडके | Published: May 30, 2023 05:41 PM2023-05-30T17:41:29+5:302023-05-30T17:42:04+5:30

ठेकेदाराला ५ लाखांचा दंड, अभिंयत्याला बजावली कारणे दाखवा नोटीस

error found in road works commissioner took action against the engineer and the contractor | रस्त्यांच्या कामात आढळली त्रुटी; आयुक्त बांगर यांनी केली अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई

रस्त्यांच्या कामात आढळली त्रुटी; आयुक्त बांगर यांनी केली अभियंता आणि ठेकेदारावर कारवाई

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केली होती. या पाहणी दौºयात रस्ते साफसफाई व इतर कामांबाबत त्रुटी आढळल्या होत्या. त्यानुसार संबधींत अधिकाºयावर जबाबदारी निश्चित करुन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कार्यकारी अभियंता यांना कारणे दाखवा नोटीस तर ठेकेदेराला ५ लाखांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय उद्यान ठेकेदाराला देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

मुख्यमंत्री शिंदे यांनी गेल्या आठवड्यात ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. या पाहणी दौºयात वसंत विहार येथील कॉनवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

उद्यान ठेकेदारांना नोटीसा

टिकूजीनीवाडी सर्कल ते नीळकंठ रोड रस्ता दुभाजक व हरित जनपथ या ठिकाणी निगा व देखभाल योग्यरित्या नसल्याचे आढळून आले. या ठिकाणी झाडे सुकलेल्या अवस्थेत आहेत. तसेच सदर ठिकाणी पालापोचाळा, प्लॅस्टिक व इतर कचरा साठलेला दिसून आला. हरित जनपथामध्ये मोकळी जागा निदर्शनास आल्याने मे. निसर्ग लॅण्डस्केप प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला आयुक्त बांगर यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच सदर नोटीशीत सुकलेली झाडे काढून तेथे नवीन झाडे लावणे, मोकळया जागेत नव्याने झाडे लावणे व जंगली गवत झाडे काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वर्तकनगर प्रभाग समिती अंतर्गत गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी झाडे लावून सुशोभिकरण करणे अपेक्षित असताना मोकळ्या जागा निदर्शनास आल्या. तसेच रस्ता दुभाजक व हरित जनपथात अनेक ठिकाणी गवत/ तण नियमित काढले न गेल्याने त्याची वाढ मोठ्या प्रमाणावर झाली असल्याचे दिसून आले. तसेच झाडांना नियमित पाणी दिले जात नसल्याने झाडे सुकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मुख्यमंत्र्यांच्या निदेर्शानुसार मे. पायोनिअर आऊटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. या कंपनीच्या ठेकेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

कंत्राटदाराला ५ लाखांचा दंड

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वर्तकनगर, लोकमान्य- सावरकरनगर, नौपाडा, कोपरी, कळवा प्रभाग समितीमधील विविध रस्त्यांचे डांबरीकरणाने पुर्नपृष्ठीकरणाचे काम मे. आर.पी. एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. या कामादरम्यान कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आढळून आलेल्या नाहीत. मास्टीक, अस्फाल्ट पध्दतीने करावयाच्या डांबरीकरणाच्या कामाध्ये काम करणाºया मजदूरांना, सुरक्षिततेच्या दृष्टीने सेफ्टी शूज, हॅण्डग्लोज, हेल्मेट उपलब्ध करुन देण्यात आलेले नसल्याचे दिसून आले त्यामुळे या कंत्राटदार कंपनीला ५ लाख  रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.

रस्ते साफसफाई ठेकेदारालाही नोटीस

वर्तकनगर प्रभागसमिती अंतर्गत येत असलेल्या पवार नगर येथील रस्ते साफसफाईचा ठेका व्यंकटेशा या कंपनीस देण्यात आलेला आहे. परंतु नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील दैनंदिन रस्त्याची योग्य प्रकारे साफसफाई न करणे. तसेच रस्त्यावर काम करीत असलेल्या कर्मचाºयांना गणेवश, तसेच इतर सुरक्षा साधने दिले नसल्याचे आढळून आले. रस्त्यावर ठिकठिकाणी कचºयाचे ढीग निदर्शनास आल्याने संबंधित ठेकेदारास नोटीस बजावून दहा हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.  

निगा देखभालीची जबाबदारी पार न पाडणाºया होणार कारवाई

महापालिका क्षेत्रातील उद्याने अद्ययावत रहावीत यासाठी ठेकेदार पध्दतीने जाहिरातीच्या बदल्यात उद्यान, चौक व ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करण्याबाबतचा करार करण्यात आला आहे. मे. पायोनिअर आडटडोअर मिडीया सोल्युशन प्रा.लि. कंपनीला वर्तकनगर प्रभागसमिती गावंडबाग ते हिरानंदानी मिडोज येथील दुभाजक व हरित जनपथाची निगा देखभाल करणे. मे. रोनक अडर्व्हटायझिंग या कंपनीला एमएमआरडीए व एमएसआरडीसी ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे, ठाणे शहरातील ५० चौक तसेच ठाणे स्थानक परिसर सुशोभित करणे. मे. अ‍ॅड स्पेस पब्लिसिटी एलएल पी यांना जेल तलाव ते गोल्डन डाईज नाका, तीन पेट्रोल पंप ते मखमली तलाव, भास्कर कॉलनी ते नौपाडा प्रभाग समिती येथील ब्रीज खालील मोकळ्या जागा सुशोभित करणे. तसेच सारथी अडर्व्हटायझिंग यांना रमाबाई आंबेडकर उद्यान सुशोभिकरणाचा ठेका देण्यात आला आहे. या कंपनीबरोबर केलेल्या करारनाम्यातील अटी व शतीर्नुसार उद्यानांची दैनंदिन निगा व देखभाल योग्यप्रकारे राखली न गेल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.

Web Title: error found in road works commissioner took action against the engineer and the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.