जागेच्या मंजुरीनंतरही जि.प.कडून शहापूरच्या १५ गावांचे रस्ते कागदावरच; गांवकरी संतप्त!
By सुरेश लोखंडे | Published: April 14, 2024 06:40 PM2024-04-14T18:40:20+5:302024-04-14T18:40:27+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गमभागातील गांवाच्या विकासासाठी त्यांना रस्त्याशी जाेडणे गरजचे आहे. मात्र शहापूर तालुक्यातील २७ गांवांना रह्तेच नसल्याचे लोकमतने वेळोवेळी उघड केले. त्यास अनुसरून श्रमजीवी संघटनेने आंदोलने छेडून प्रशासनाला जागे केले. वन विभागाला जाणीव करून देते १५ गावांच्या रस्त्यांचे दावे अखेर वनविभागने मंजूर केले. त्या रस्त्यांवर आजपर्यंतही ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून आतापर्यंत एक घमेले मातीही टाकली नसून कामाला सुरूवातही केली नसल्याचे श्रमजीवींचे संपर्कप्रमुख प्रकाश खाेडका यांनी लाेकमतला सांगितले.
वनविभागाकडून जागा दिली जात नाही. त्यामुळे शहापूरच्या ग्रामीण, दुर्गम भागातील रस्त्यांची कामे करता येत नसल्याची वल्गना ठाणे जिल्हा परिषदेने अतापर्यंत केली आहे. पण आदिवासी, गावकऱ्यांनी श्रमजीवीच्या माध्यमातून वनविभागाकडे सतत पाठपुरावा करीत अखेर १५ गावांच्या रस्त्यांसाठी वनविभागाकडून सहमती मिळवली. त्यास अनुसरून उद्भवणारी रस्त्यांची समस्या या पावसाळ्यात नक्की कमी हाेईल, अशी आशा असलेल्या गांवकऱ्यांची यंदाही फाेल ठरली आहे. एकाही गावाच्या रस्त्याचे काम जिल्हा परिषदेने सुरू केले नसल्याची खंत खाेडका यांनी व्यक्त केली आणि श्रमदानातून आजपासून रस्त्याच्या कामाला सुरूवात केली आहे.
रस्ते सलेल्या या गावातील रहिवाश्यांना, रुग्ण, गरोदर माताना रुग्णालय गाठण्यापूर्वी जीव गमवावे लागले. शाळकरी मुलांना नदी, नाल्याच्या पुरातून मार्ग काढत शाळा गाठावी लागली. त्यांच्या या समस्यांना वाचा फोडण्यासाठी श्रमजीवीसारख्या सामाजिक संघटना व लोकमतने एकत्र येऊन जिल्हा प्रशासनाचे, वनविभागाचे लक्ष वेधून घेत लोकप्रतिनिधींना जाणीव करून दिली. वनविभागाने २७ पैकी १५ गांवाच्या रस्त्यांसाठी जागा प्रस्तावाव्दारे मंजूर करुन घेतल्या. या गांवाना रस्त्याने जोडण्यासाठी वनविभागाने सहमती दिली आहे. या रस्याच्या जागेचा लाभ झालेल्यांमध्ये वेहलोंडे, बोरशेती-कळंबे, तळीचापाडा यांचा समावेश आहे, तर कुटेपाडा, जाधव पाडा, कातकरीवाडी,खुटघर,नडगांव,कोठारे, अजनूप,दळखण,टेंभा,वेहळोली,वेळुकचा पटकीपाडा, तरीचा पाडा आदी गांवांचा समावेश आहे.
या गावांच्या रस्यांची जागा वनविभागाने मंजूर केल्यामुळे गांवकर्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. त्यावर जिल्हा परिषदेकडून या रस्त्याचे काम सुरू करणे अपेक्षित हाेते. एखाद्या रस्त्याचे काम हाती घेतले असते तरी गांवकऱ्याच्या आशा पल्लवीत झाल्या असत्या. पण त्यानुसार या गावाचा एकही रस्ता जिल्हा परिषदेला तयार करता आलेला नसल्यामुळे आदिवासी, गावकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अखेर त्यांनी श्रमदानातून अन्य गावाच्या रस्त्याचे काम हाती घेतल्याचे निदर्शनात आले आहे.