युती झाली तरी राडेबाजी सुरूच

By admin | Published: November 14, 2015 03:31 AM2015-11-14T03:31:53+5:302015-11-14T03:31:53+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपा एकत्र आले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी सुरूच आहे.

Even if there is a coalition, rowdy continued | युती झाली तरी राडेबाजी सुरूच

युती झाली तरी राडेबाजी सुरूच

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत सत्तेसाठी शिवसेना भाजपा एकत्र आले तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी सुरूच आहे. येथील पूर्वेकडील महालक्ष्मी शॉपिंग सेंटरच्या परिसरात बुधवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भाजपा कार्यकर्त्यांनी शिवसैनिकांना मारहाण केल्याची घटना घडली. यात शिवसेनेचे प्रमोद ओहाळ आणि जितेंद्र प्रसाद हे दोन कार्यकर्ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी विशाल जाधव, सचिन जाधव, अनंत गायकवाड आणि शेखर क्षीरसागर यांच्यावर कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हे केले आहेत.
युतीचा महापौर विराजमान होऊन काही तासांचा कालावधी उलटत नाही तोच ही घटना घडली. जाईबाई विद्यामंदिर प्रभागात शिवसेनेचे उमेदवार रमेश जाधव यांनी भाजपाचे उमेदवार संदीप जाधव यांचा पराभव केला आहे. पराभूत झाल्याचा राग मनात धरून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप ओहाळ यांनी केला आहे. ओहाळ यांना त्यांचा मित्र नितीन जाधव याने फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याची माहिती दिली. त्यामुळे ओहाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना लोखंडी पाइपने जबर मारहाण करण्यात आली. त्यांच्यासह जितेंद्र आणि नितीन या त्यांच्या मित्रांनाही चौघांनी मारहाण केली. याप्रकरणी दाखल तक्रारीवरून भाजपा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Even if there is a coalition, rowdy continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.