नापास झालो, तरी सारे आयुष्य संपत नाही

By admin | Published: March 5, 2017 03:08 AM2017-03-05T03:08:37+5:302017-03-05T03:08:37+5:30

अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला

Even if you lose it, the whole life does not end | नापास झालो, तरी सारे आयुष्य संपत नाही

नापास झालो, तरी सारे आयुष्य संपत नाही

Next

- जान्हवी मोर्ये,  ठाणे
अनेक तरुण-तरुणी स्पर्धा परीक्षा देतात. मात्र परीक्षेत पास झालो नाही, तर सगळे आयुष्य संपले, असे समजण्याची कारण नाही. अपयशाकडेही सकारात्मक वृत्तीने पाहा, असा सल्ला ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला.
स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलनात ते बोलत होते. कोणत्याही करिअरचा विचार करताना दिवास्वप्ने पाहू नका. उघड्या डोळ््यांनी स्वप्ने पाहा. त्यामुळे तुम्हाला अपयशही आले, तरी भ्रमनिरास होणार नाही, असे सांगत जयस्वाल म्हणाले, कोणतेही काम करताना निष्ठा असावी. पालकांनीही त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. उलट कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी विकसित करावी.
स्पर्धा परीक्षेत यशस्वी झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी विसरू नये. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

मराठी शिकलो नसतो तर
मी पॅशनेट होऊन करिअर करण्याचे ठरविले होते. आम्ही चार भाऊ होतो. घरातून मला पाठिंबा होता. राज्य व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचे ठरविले. लोकसेवा या शब्दात लोकांसाठी काम करायचे आहे. हे लक्षात ठेवून त्यात यशस्वी हेण्याचे ध्येय उराशी ठेवले होते. परीक्षा पास झाल्यावर माझे पहिले पोस्ंिटग महाराष्ट्रात झाले. माझ्या गुरुस्थानी असलेल्या एका मित्राने काय कर किंवा काय करु नको यापेक्षा महाराष्ट्रात काम करण्याआधी मराठी शिकण्याचा सल्ला दिला. तो मला कामी आला.त्यावेळी त्याचा सल्ला ऐकला नसता तर माझे काय झाले असते, असा विचारही मला आज मनाला चाटून जातो. पहिल्याच दिवशी मराठीतून पत्रव्यवहार लिहिण्याची वेळ आली. अन्य राज्यात प्रशासकीय व्यवहार इंग्रजीतून केला जातो. महाराष्ट्रात तो मराठीतून केला जातो, याचे समाधान आहे, अशा भावना जयस्वाल यांनी मांडल्या.

वाईट वळणाला लागलो होतो
यशाकडे वाटचाल करताना जीवनाच्या एका टप्प्यावर तरुणपणी माझेही पाऊल वाकडे पडले होते. एका परीक्षेत गुण कमी मिळाले. तेव्हा मी दारु आणि सिगारेटचा धूर काढत होतो. तेव्हा माझे वडील वारले होते. त्यावेळी आईने मला एकाच शब्दात सुनावले, बाबा असते तर त्यांना हे पाहून काय वाटले असते? ते शब्द काळजाला घर पाडणारे ठरले. तेव्हाच ठरवले, दारु आणि सिगारेटचा धूर पुन्हा काढायचा नाही आणि माझ्या करिअरची गाडी मूळ ट्रॅकवर आली. त्याचे श्रेय माझ्या निरक्षर आईला जाते. शिकलेलीच माणसे वळणावर आणतात असे नाही... हे सांगताना जयस्वाल भावनावश झाले होते.

नोकरी राजासारखी करा!
नोकरी राजासारखी करा. चांगले काम देव पाहत असतो. त्याच्या दरबारात चांगल्याची नोंद होत असते.कोणाला फसवू नका. स्वत:ला फसवून तुम्ही आनंदी राहू शकत नाही. कोणतेही काम करताना चांगला माणूस होणे गरजेचे आहे, याकडे जयस्वाल यांनी लक्ष वेधले. कठोर मेहनत घेऊन जे यश मिळते, त्याच्या आनंदाचा पारावर राहत नाही. तो आनंद कोणत्याही तराजूने न तोलण्यासारखा असतो. खरा आनंद असतो, असे त्यांनी सांगितले.

बदलीसाठी घेतला होता पंगा : चंद्रपूरला माझे पोस्ंिटग झाले. त्यावेळी मी अनेकांशी पंगा घेतला होता. पंगा घेतला, की सरकारकडून माझी लगेच बदली केली जाईल, अशी माझी धारणा होती. पण माझे चांगले काम पाहून मला साडेतीन वर्षे चंद्रपूरमध्ये ठेवले. त्यानंतर मात्र मी कुटुंबीयांचा विचार करून बदली करून घेतली, असा किस्सा त्यांनी सांगितला.

Web Title: Even if you lose it, the whole life does not end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.