अखेर कुर्गचा दौरा झाला रद्द, भाजपावर टीकेची झोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:07 AM2018-05-04T02:07:30+5:302018-05-04T02:07:30+5:30
नागरिकांवर केलेली करदरवाढ, पालिकेवरील कर्जाचा डोंगर, निधीअभावी विकासकामांना कात्री, कर्मचारीकपातीची नामुश्की असताना नगरसेवकांच्या पर्यटन दौऱ्यावरून
मीरा रोड : नागरिकांवर केलेली करदरवाढ, पालिकेवरील कर्जाचा डोंगर, निधीअभावी विकासकामांना कात्री, कर्मचारीकपातीची नामुश्की असताना नगरसेवकांच्या पर्यटन दौऱ्यावरून सत्ताधारी भाजपावर टीकेची झोड उठली होती. महापौरांपासून अन्य पदाधिकाºयांनी दौºयांचे समर्थन केले होते. परंतु, आता मीरा-भार्इंदर महापालिकेच्या नगरसेवकांचा कर्नाटकमधील कुर्ग या पर्यटनस्थळी जाणारा दौरा अखेर गुंडाळला आहे. या दौºयाच्या निविदा रद्द केल्याचे प्रशासन सांगते, तर आमदार नरेंद्र मेहतांनी नगरसेवकांचे कान टोचल्याने हा दौरा गुंडाळल्याचे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे.
महिला बालकल्याण समितीचा दार्जिलिंग येथे, तर वृक्ष प्राधिकरण समितीचा नैनीताल-डेहराडून या पर्यटनस्थळी प्रत्येकी १० लाख खर्चून, तर मेमध्ये सर्व नगरसेवकांचा कुर्ग येथे दौरा होता. ४५ लाख खर्च दौºयावर येणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने देताच विविध स्तरांतून या दौºयांना विरोध झाला. काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी, तर काँग्रेसचे सर्व १२ नगरसेवक दौºयाला जाणार नाहीत, अशी भूमिका घेतली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत, मनसे शहराध्यक्ष प्रसाद सुर्वे, जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम, सत्यकामचे कृष्णा गुप्ता आदींनी दौरा रद्द करण्याचे पत्र देत भाजपावर टीका केली होती. तर, भाजपाच्या माजी महापौर गीता जैन यांच्यासह विरोधी पक्षनेते राजू भोईर, दीप्ती भट, नीलम ढवण, शर्मिला बगाजी, अनिता पाटील, भावना भोईर, धनेश पाटील आदींनी दौºयाला विरोध केला.
या दोन दौºयांचा सविस्तर अहवाल अद्याप संबंधित अधिकारी तसेच नगरसेवकांनी दिलेला नाही. पालिकेनेही तो संकेतस्थळावर टाकलेला नाही. या दौºयांचा खर्च संबंधित नगरसेवक, अधिकाºयांकडून वसूल करण्याची मागणी होत आहे. मेहता यांनी मात्र नगरसेवकांच्या आढावा बैठकीत कुर्ग दौरा करू नका. दौºयावरून वातावरण तापले असल्याने नंतर पाहू, अशी भूमिका घेतल्याचे भाजपाच्या सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे नगरसचिव वासुदेव शिरवळकर यांनी कुर्ग दौरा रद्द केल्याचे सांगत सुमारे ४५ लाख खर्चाच्या दौºयाचे कंत्राट मागवले होते. निविदाही आल्या होत्या. पण, त्या रद्द केल्याचे म्हणाले. ५५ ते ६० नगरसेवकांनी होकार दर्शवला होता.