गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय नववर्ष स्वागतयात्रा संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 01:53 PM2019-04-06T13:53:00+5:302019-04-06T13:59:36+5:30
ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागतयात्रा शनिवारी संपन्न झाली. सकाळी सात वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज ...
ठाणे : श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित स्वागतयात्रा शनिवारी संपन्न झाली. सकाळी सात वाजता मासुंदा तलाव येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन पालखीस सुरूवात झाली.
सुरूवातीला पालखीचे भोई पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर शिंदे, आ. संजय केळकर, स्वागताध्यक्ष सुहास मेहता झाले होते. त्यानंतर रंगोत्सव बापुजी गुप्ते चौक येथून स्वागतयात्रेस सुरूवात झाली. वर्षानुवर्षे परंपरा असलेल्या राजमार्गावरुन यंदाही स्वागतयात्रा काढण्यात आली. त्यामुळे ही स्वागतयात्रा गोखले रोड या मार्गाहून पुढे निघाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे, माजी खासदार संजीव नाईक हे देखील पालखीचे भोई होण्याची संधी सोडली नाही. चिंतामणी चौक आणि हरिनिवास सर्कल यांठिकाणी राजकीय नेते आणि न्यासाच्या पदाधिकाऱ्यांनी पालखीवर पुष्पावृष्टी केली तर गोखले रोड येथे आल्यावर पालकमंत्री, महापौर, सभागृह नेते नरेश म्हस्के भाजपच्या नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे व इतर राजकारण्यांनी पालखीवर पुष्पावृष्टी केली. या स्वागतयात्रेत खा. राजन विचारे, आ. रविंद्र फाटक, आ. निरंजन डावखरे, भाजपा ठाणे जिल्हा शहराध्यक्ष संदीप लेले, ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले देखील सहभागी झाले होते. पालखीदरम्यान ‘हर हर महादेव’, ‘कौपिनेश्वर महाराज की जय’, ‘ऊॅँ नम: शिवाय’ चा गजर सहभागींकडून केला जात होते. या स्वागतयात्रेत अबालवृद्ध सहभागी झाले होते. पालखीच्या मार्गावर रांगोळ््यांच्या पायघड्या घातल्या गेल्या होत्या, काही संस्थांनी पिण्याच्या पाण्याची सोय होती. सरस्वती मंदिर ट्रस्टतर्फे जिम्नॅस्टीकची प्रात्यक्षिके करण्यात आली तर इंग्रजी वभागाने प्लास्टीकमुक्तीचा आणि मराठी विभागाने मातृभाषेतून शिक्षण हा चित्ररथाच्या माध्यमातून संदेश दिला. जय हनुमान क्रिडा मंडळातर्फे मदार्नी खेळांचे प्रात्यक्षिके, सोलापूर, अकलुज येथून दत्ता वायकर यांचे गोंधळी, गावदेवी मारुती चॅरिटेबल ट्रस्ट, महागिरी कोळीवाडातर्फे गावदेवीची पालखी, ठाणे शिर्डी वारकरी प्रतिष्ठानतफे्र साईबाबांची पालखींचा सहभाग होता. शालेय विद्यार्थी सायकलवरुन ‘मतदान हे श्रेष्ठदान’, ‘सायकल चालवा, इंधन वाचवा’ यांसारखे संदेश देण्यात आले. डॉ. बेडेकर विद्या मंदिराचे स्काऊट गाईड आणि लेझीम पथक तर जोशी बेडेकर महाविद्यालय एनसीसी विभागाचे लेझीम पथक आणि दांडपट्ट्याचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आले. नि:स्वार्थ सामाजिक संस्था, जांभळी नाकातर्फे स्त्रीशक्तीचा जागर म्हणून अर्धनटनारेश्वर दाखविण्यात आले. कºहाडे ब्राह्मण संघातर्फे शून्य कचऱ्याचा संदेश दिला, परंतू रस्त्यात जागोजागी पडलेला कचराही त्यांनी गोळा करीत स्वच्छतेचा संदेश दिला. मराठी ग्रंथसंग्रहालयाच्यावतीने पु. ल. देशपांडे यांची व्यक्तिचित्रे साकारली होती तर ठाणे भारत सहकारी बँकेने गदिमा आणि बाबुजी यांच्यावर आधारीत चित्ररथ साकारला होता. बायोकंपोस्ट खत प्रकल्प निमिर्तीचा संदेश देणारा हरियालीचा चित्ररथ, ठाणे महापालिकेचे आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभागाचा चित्ररथ, अग्निशमनदलाचे बँडपथक सहभागी होती, भगिनी निवेदिता उत्कर्ष मंडळातर्फे विविध राज्यांतील नृत्ये करण्यात आली. मासेमार दालदी मंडळ, बाळकुमचे कोळी बांधव भगिनी आपल्या पारंपारिक वेशभूषेत सहभागी होऊन कोळी नृत्ये करीत होती तर अंगणवाडी सेविकांनी यंदा आदीवासी नृत्ये केली. रोट्रॅक्ट क्लबतर्फे विविधता मे एकता, हुंडाबळी, मासीकपाळी हे विषय हाताळले. विशेष म्हणजे या स्वागतयात्रेत एसटीचे कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन सार्वजनिक वाहनांचा वापर करण्याचा संदेश दिला तसेच, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समितीच्या ज्येष्ठांनीही या यात्रेत सहभाग घेतला. ठाणे महानगर तेली समाजाने चित्ररथावर आई तुळजा भवानीचा पलंग ठेवलेला आणि मतदानाविषयी देखील जनजागृती केली. सर्वज्ञ समाजप्रबोधन संस्थेने बैलगाडीवरुन व्हॅलेण्टाईन आणि थर्टीफर्स्ट हिंदुस्थानातून घालवूया हा संदेश दिला. म्यूस फाऊंडेशनने मासिकपाळीविषयी असलेल्या अंधश्रद्धेला विरोध करीत जनजागृती केली.
---------------------------------
फोटो : विशाल हळदे