'सर्वजण मराठा आरक्षाच्या बाजूने, नेत्यांना गावबंदी, रस्ता रोको याचा विचार झाला पाहिजे'; बावनकुळेंचं आवाहन
By मुरलीधर भवार | Published: October 28, 2023 10:28 PM2023-10-28T22:28:19+5:302023-10-28T22:32:14+5:30
Kalyan News: राज्यातले विधिमंडळ कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटते मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गावबंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे असा मराठा समाजाला दिला आहे.
- मुरलीधर भवार
कल्याण - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संघटना आक्रमक आहेत. रास्ता रोको करुन नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय नेत्यांच्या गाड्या फोडल्या जात आहेत. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, ज्या उद्धव ठाकरे सरकारने मराठा आरक्षण घालवले. त्या सरकारला लाथ मारून मर्द मराठा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राला मराठा समाजाला आरक्षण देण्याचा संकल्प केला आहे. मराठा आरक्षणाला कोणीही विरोध करत नाही. राज्यातले विधिमंडळ कॅबिनेट ,राज्यातले सर्व पक्ष, सर्व जनता मराठा आरक्षणाच्या बाजूने आहे. त्यामुळे मला वाटते मराठा समाजाला सर्वांचे समर्थन आहे. मग गावबंदी किंवा नेत्यांना रोखणे याचा विचार झाला पाहिजे असा मराठा समाजाला दिला आहे.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी म्हणाले की, सर्व पक्षांनी एकत्र येऊन एक दिवसीय अधिवेशन घेतले तरी आम्हाला ते मान्य असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल कल्याणमध्ये आमदार गणपत गायकवाड यांना भेटीसाठी आले होते. यावेळी जिल्हाध्यक्षांनी पोलीस आणि महपालिका प्रशासन सहकार्य करत नसल्याची खंत फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील धूसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. याविषयी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले की, राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.आमची जबाबदारी आहे सर्व मित्र पक्षाना समजून घ्यायचे , तसेच कल्याणमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेजी मोठे भाऊ आहेत. हे आमच्या घरातले प्रश्न आहेत आणि घरात निपटून टाकू. एकनाथ शिंदे आणि आम्ही भाऊआहोत. थोडेसे गैरसमज असतील तर आम्ही मान्य करू आणि पुढे जाऊ.
मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी मोदींवर टीका केली होती .याविषयी बावनकुळे यांनी अजून मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारचा संबंध आलेला नाही, तर मोदीजी काय बोलणं करतील. राज्य सरकारने न्यायालयाने सुचवलेल्या बाबींप्रमाणे कारवाई करायची आहे ,त्यानंतर केंद्र सरकारची भूमिका येईल उगाच मोदीजींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. भाजपापासून सर्वच पक्ष एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे आहेत. पण कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी करता कामा नये ,मराठा समाजाला वेगळे आरक्षण दिले पाहिजे यासाठी संपूर्ण महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांच्या मागे उभा आहे.
आज कल्याण पश्चिमेतील एका हा’टेलच्या सभागृहात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ््यांसी संवाद साधला. कल्याण पश्चिम, शहापूर आणि मुरबाड मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. या प्रसंगी केंद्रीय पंचायत राज मंत्री कपील पाटील यांच्यासह भाजप आमदार किसन कथोरे आणि माजी आमदार नरेंद्र पवार उपस्थित होते.