गाफील न राहता परिस्थितीवर सर्वांनीच नियंत्रण ठेवावे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2021 10:18 PM2021-04-11T22:18:53+5:302021-04-11T22:19:51+5:30

पार्र्किं ग प्लाझा हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्यामुळे रु ग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.

Everyone should control the situation without being ignorant | गाफील न राहता परिस्थितीवर सर्वांनीच नियंत्रण ठेवावे

आॅक्सिजन संपल्याच्या घटनेनंतर आमदार निरंजन डावखरे यांचे आवाहन

Next
ठळक मुद्देआॅक्सिजन संपल्याच्या घटनेनंतर आमदार निरंजन डावखरे यांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पार्र्किं ग प्लाझा हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्यामुळे रु ग्णांना तातडीने हलविण्याची घटना गंभीर आहे. सध्या आपत्तीच्या काळात सत्ताधारी आणि महापालिकेने गांभीर्याने परिस्थिती हाताळावी. कोणत्याही परिस्थितीत गाफील राहू नये, असे आवाहन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांनी केले आहे.
ठाणे महापालिकेने पार्र्किं ग प्लाझा येथे उभारलेल्या हॉस्पिटलमधील आॅक्सिजन संपल्याचा प्रकार धक्कादायक होता. अशा प्रकारांमुळे रु ग्ण आणि नातेवाईकांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल. सध्या ठाण्यातील रु ग्णांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी प्रयत्न करायला हवा. शनिवारच्या घटनेनंतर यापुढे सत्ताधारी आणि महापालिका प्रशासनाने परिस्थिती गांभीर्याने हाताळावी. कोविडची पहिली लाट ओसरल्यानंतर अनेकजण काहीसे निर्धास्त झाले. मात्र, दुसऱ्या लाटेमुळे गंभीर संकट निर्माण झाले. त्यातच पार्र्किं ग प्लाझातील परिस्थितीमुळे हॉस्पिटलची व्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र निर्माण झाले. शहरात बेड, व्हेंटिलेटर आणि रेमडेसिविरचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत महापालिका प्रशासनाने संयम व जबाबदारीने परिस्थिती हाताळावी. व्हेंटिलेटर, रेमडेसिविर किंवा आॅक्सिजनअभावी रु ग्णाचा जीव जाऊ शकतो, याचे भानही ठेवावे. त्याचबरोबर कोविड आपत्तीत टाळूवरील लोणी खाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे व्हेंटिलेटर खरेदीतील लाच प्रकरणातून उघडकीस आले. त्यामुळे सत्ताधारी व महापालिकेने सतर्कताही बाळगावी, असे आवाहन आमदार डावखरे यांनी केले आहे.
सर्वपक्षीय सहकार्य घेण्याची गरज
कोविड आपत्तीत लोकसहभागाबरोबरच सर्वपक्षीय खासदार, आमदार, नगरसेवक आदी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यातून संंशयित रु ग्णांची टेस्टिंग, ट्रॅकिंग आणिर आयसोलेशन वेगाने होण्याबरोबरच कोरोना साखळी मोडण्यासही मदत होईल. यातूनच कोरोनाची दूसरी लाट दूर करता येईल, असा विश्वास आमदार डावखरे यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Everyone should control the situation without being ignorant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.