सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करावे : राजसी मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:26 AM2021-07-04T04:26:57+5:302021-07-04T04:26:57+5:30

२९ रक्तदात्यांनी केले रक्तदान लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली: कोरोना काळात अनेकांना रक्ताची गरज भेडसावत आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे ...

Everyone should donate blood regularly: Rajasi Mohite | सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करावे : राजसी मोहिते

सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करावे : राजसी मोहिते

Next

२९ रक्तदात्यांनी केले रक्तदान

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली: कोरोना काळात अनेकांना रक्ताची गरज भेडसावत आहे, त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्या सगळ्यांनी आवर्जून रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपावी. मी स्वतः रक्तदान केले असून नागरिकांनी न घाबरता पुढे यावे, असे आवाहन इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टच्या अध्यक्षा राजसी मोहिते यांनी केले.

इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ के. व्ही. पेंढरकर कॉलेज, रोट्रॅक्ट क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली यांच्या पुढाकाराने लोकमतच्या माध्यमातून शनिवारी पश्चिमेकडील शुभमंगल हॉल येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. त्यामध्ये २९ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.

त्यावेळी रो. प्रियांका दुबे, रो. विपाशा शर्मा, रो. गौरव काळे, रो. उल्का सावला, रो. ललित तर्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

या रक्तदात्यांनी केले रक्तदान

आकाश गायकवाड, मेघना धुल्ला, राजसी मोहिते, योगेश जांबरे, निशील शेट्टी, आरती धूत, संकल्प तांबे, संदीप बोंडे, प्रशांत रहाटे, शैलेश गुप्ते, प्रसाद राणे, अनिकेत शिरकर, प्रवीण एम., श्रुती कुरूप, नीरज निगुडकर, गिरीश पोफळे, श्वेता गोवंडी, निखिल लोखंडे, मिहीर कोचरेकर, अतुल मालदे, मयूर कोलते, सलीम अली, गौरव कोंडुलकर, जैसीलन नाडर, नितीन म्हसकर, वर्षा देशपांडे, प्रवीण परमार, सुवर्णा गिरोसे, महेश बोरसे.

..............

वाचली

Web Title: Everyone should donate blood regularly: Rajasi Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.