सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:40 AM2021-03-05T04:40:24+5:302021-03-05T04:40:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणो : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या नावाची लस दिली जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या ...

Everyone will have to wait a year to get the corona vaccine | सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार

सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभराची वाट पाहावी लागणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणो : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ या नावाची लस दिली जात आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यानंतर आता या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत या लसीकरणाचा पहिला डोस ९३ हजार ८७६ जणांनी घेतला आहे. तर दुसरा डोस १६ हजार ७६८ जणांनी घेतल्याचे निदर्शनात आले आहे. याप्रमाणे लसीकरण सुरू राहिल्यास जिल्ह्यातील सर्वांना कोरोना लस मिळण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागणार असल्याचे ऐकायला मिळत आहे.

केंद्र शासनाच्या तांत्रिक समितीने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी राज्यभरात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन लसींना मान्यता दिली आहे. यापैकी जिल्ह्यात ‘कोविशिल्ड’ हा डोस दिला जात आहे. जिल्ह्यातील पहिल्या फळीतील आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात ‘कोविशिल्ड’ लस दिली जात आहे. याशिवाय दुसऱ्या फळीतील पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आदीं एक लाख ७५ हजार ४२२ जणांना ही लस देण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत या फ्रंटलाइन वर्करसह पोलीस आणि प्रशासनाच्या ५७ हजार ८०० अधिकारी कर्मचाऱ्यांनी या लसीचा पहिला डोस घेतला. यानंतर २८ दिवसांनी घ्यावा लागणारा दुसरा डोस १६ हजार ७६८ जणांनी घेतला आहे. या अधिकाऱ्याप्रमाणेच आता १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे.

----

Web Title: Everyone will have to wait a year to get the corona vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.