प्रत्येकाचे प्रगती पुस्तक तपासले जाणार, अन्यथा होणार कारवाई - उदय सामंत यांचा इशारा
By अजित मांडके | Published: June 5, 2024 04:42 PM2024-06-05T16:42:24+5:302024-06-05T16:42:45+5:30
ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले.
ठाणे : इंडिया आघाडीने जातीय ध्रुवीकरण करीत चुकीचा प्रचार केला आणि त्या प्रचाराला जनता बळी पडली. मात्र आता अवघ्या २४ तासाच्या आतच ते त्यांना विसरले. परंतु आमच्या कुठे चुका झाल्या, कोण कुठे कमी पडले, याचे आत्मचिंतन केले जाईल आणि विधानसभेला त्यांना व्याजसकट हिसाब परत केला जाईल असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दुसरीकडे कोणी चांगले काम केले कोणी केले नाही, याचा अहवाल येत्या आठ दिवसात घेतला जाणार असून प्रत्येकाचा प्रगती पुस्तक तपासले जाईल असा इशारा देत जे यात नापास झालेले असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाण्यात आनंद आश्रम येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. निवडणुकीत इंडिया आघाडीने संविधान बदलणार मुस्लीमांच्या बाबतीत अप्रचार केला, त्याचा त्यांना फायदा झाल्याचेही ते म्हणाले. परंतु आम्ही गाफील राहिलो, त्यामुळेच काही ठिकाणी समीकरणे चुकीली असल्याचेही ते म्हणाले. परंतु निवडून आल्यानंतर त्याचा साधा उल्लेख सुध्दा त्यांनी केलेला नसल्याचे ते म्हणाले. उमेदवार उशीराने घोषीत करणे, प्रचाराला कमी दिवस मिळाल्याने आणि काही ठिकाणी उमेदवार बदलावे लागल्यानेही आम्ही मागे पडलो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांना आम्ही व्याजासकट परत करु असा दावा करीत राज्यात विधानसभा निवडणुकीत २०० जागांवर निवडून येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे यांनी २१ जागांवर निवडणुक लढविली. मात्र त्यांना ९ जागांवर समाधान मानावे लागले. मात्र आम्ही १५ जागा लढून ७ जागा जिंकल्या. त्यामुळे उभाठा पेक्षा आमचा स्ट्राईक रेट अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले.
निवडणुकीपूर्वी ईव्हीएमवर हल्ला झाला आणि आता निवडणुका झाल्या आणि जागा आपल्या बाजूने आल्या. मात्र आता ईव्हीमीवरील हल्ला थांबला असल्याचेही ते म्हणाले. त्यातही ज्यांच्या हातून कोकण गेले, संभाजी नगर गेले, अशांनी आपली काय स्थिती आहे, हे समजून जावे असा इशाराही त्यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला.
पदवीधर आणि शिक्षण मतदारसंघाच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सामंत म्हणाले की, विधान परिषदेच्या जागांसाठी तिन्ही पक्षांमध्ये चर्चा करून निर्णय घेतला जाईल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी एकत्र येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विजय संपादन करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.