उल्हासनगरातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई
By सदानंद नाईक | Published: May 28, 2024 05:43 PM2024-05-28T17:43:42+5:302024-05-28T17:43:55+5:30
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली.
सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिकेने पावसाळ्यापूर्वी ३१६ धोकादायक इमारतीची यादी जाहीर करून त्यातील अतीधोकादायक इमारतीवर निष्कसिताची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. अशी माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली असून अतिधोकादायक इमारती शेजारील इमारती खाली करण्यात आल्या आहेत.
उल्हासनगर महापालिकेने पावसाळ्यापूर्वी एकून ३१६ धोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. त्यापैकी अतिधोकादायक असलेल्या इमारती पैकी कॅम्प नं-५ परिसरातील मिनर्वा, रूपानी, गंगासागर व पवनधाम इमारतीला नोटिसा देऊन निष्कसित करण्याची कारवाई मंगळवार पासून सुरू केली. तसेच धोकादायक इमारतीला नोटिसा देऊन घरे खाली करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. एकून ३१६ धोकादायक इमारती मध्ये हजारो नागरीक जीवमुठीत घेऊन राहावे लागत असून महापालिकेकडे आपत्कालीन वेळेत कोणतेही ट्रान्झिट कॅम्प उपलब्ध नाही. ज्या अतिधोकादायक इमारतीवर निष्कसितची कारवाई सुरू आहे.
त्या शेजारील इमारती व घरे खाली करण्यात आले. शहरात दरवर्षी इमारती कोसळून जीवितहानी होते. याची कल्पना असूनही महापालिका काहीएक उपाययोजना करीत नसून धोकादायक इमारत पुनर्बांधणीचा प्रश्न लटकला आहे. धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी होत नसल्याने, नागरिक जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारती राहत असल्याचे उघड झाले. तर धोकादायक इमारतीचे स्ट्रॅक्टरल ऑडिट तपासले जात असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे.