भाजपच्या माजी नगरसेवकावर वीज चोरीचा गुन्हा; वीज मीटरमध्ये छेडछाड
By धीरज परब | Published: October 27, 2023 12:14 PM2023-10-27T12:14:49+5:302023-10-27T12:15:03+5:30
भाजपाच्या गणेश गोपाळ शेट्टी या माजी नगरसेवकांवर वीजचोरीचा गुन्हा अदानी वीज कंपनीने नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे .
धीरज परब
मीरारोड - भाजपाच्या गणेश गोपाळ शेट्टी या माजी नगरसेवकांवर वीजचोरीचा गुन्हा अदानी वीज कंपनीने नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे . अदानी वीज कंपनीच्या दक्षता विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश भोसले हे सहकारी मनोज मांजरेकर व कर्मचारी यांच्या सह भाईंदर पूर्वेला आरएनपी पार्क भागात कोळी नगर येथील प्रथमेश पार्टी ग्राऊंड च्या वीज पुरवठाची तपासणी करत होते . तेथील वीज मीटर मध्ये फेरफार व छेडछाड करून अनधिकृत वीज पुरवठा घेतला गेल्याचे आढळून आले . त्यासाठी बेकायदा वायरी जोडण्यात आल्या होत्या .
अदानीच्या अधिकाऱ्यांनी तेथे असलेल्या देवेंद्र पाटील यांच्या कडे चौकशी केली असता जागेचे मालक गणेश शेट्टी असल्याचे व भाडेतत्वार ग्राउंड चालवत असल्याचे सांगितले . वीज मीटर शेट्टी च्या नावे असून तपासणीत जून २०२२ ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान १४ हजार १२७ युनिट व २ लाख ८६ हजर रुपयांची वीज चोरी असल्याचे निष्पन्न झाले . या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियम नुसार भोसले यांच्या फिर्यादी वरून बुधवारी नवघर पोलीस ठाण्यात गणेश शेट्टी व देवेंद्र पाटील विरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . हवालदार व्हनमारे तपास करत आहेत .
भाईंदर पूर्वेला अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बार मधील अश्लील आणि अनैतिक प्रकारां बाबत देखील भाजपाचे गणेश शेट्टी विरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात पिटा सह विविध गुन्हे दाखल आहेत . सदर बार चे बांधकाम अनधिकृत असून देखील कारवाई होत नसल्याचे आरोप आहेत .
जोपर्यंत देवेंद्र फडणवीस मनावर घेत नाहीत तोपर्यंत एकनाथ शिंदे कितीही शपथा घेतील त्या शपथांची किती पूर्तता होईल या बद्दल माझ्या मनात शंका आहे, असंही भास्कर जाधव म्हणाले.