माजी नगरसेवकच होणार स्वीकृत सदस्य?

By admin | Published: February 6, 2016 02:14 AM2016-02-06T02:14:51+5:302016-02-06T02:14:51+5:30

समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त नोकरशहा यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची कायदेशीर तरतूद धाब्यावर बसवत

Ex-corporators will be approved members? | माजी नगरसेवकच होणार स्वीकृत सदस्य?

माजी नगरसेवकच होणार स्वीकृत सदस्य?

Next

कल्याण : समाजातील डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, निवृत्त नोकरशहा यांना महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून काम करण्याची संधी देण्याची कायदेशीर तरतूद धाब्यावर बसवत कल्याण-डोंबिवली महापालिकेतील सर्वच राजकीय पक्षांनी माजी नगरसेवकांच्याच गळ्यात स्वीकृतची माळ घालण्याचा निर्धार केला आहे. १० फेब्रुवारीला विशेष महासभेत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.
शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ५ जागांसाठी ८ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेना, भाजपा आणि मनसेने स्वीकृतसाठी माजी नगरसेवकांना संधी दिली. ज्या राष्ट्रवादीचे स्वीकृत सदस्य निवडून देण्याएवढे संख्याबळ नाही, त्या पक्षाने वकिलास उमेदवारी देण्याचा मानभावीपणा केला आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ नुसार या पदासाठी प्रशासकीय अनुभव बंधनकारक केला आहे. त्याचबरोबर शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर आणि नोंदणीकृत अशासकीय संघटनेचा पदाधिकारी यांना ही पदे द्यावी, असे स्पष्ट केले आहे. या तरतुदीचा राजकीय पक्ष अवलंब करतात किंवा कसे, याकडे लक्ष लागले होते. सभागृहातील संख्याबळ पाहता शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांचे प्रत्येकी २ तर मनसेचा १ सदस्य असे ५ सदस्य निवडले जाणार आहेत. परंतु, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही अर्ज दाखल केले आहेत.
शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने प्रभुनाथ भोईर, विश्वनाथ राणे, संजय पावशे, जनार्दन म्हात्रे यांनी तर भाजपाकडून राजन सामंत आणि अभिमन्यू गायकवाड यांनी अर्ज भरले. मनसेकडून पवन भोसले यांनी उमेदवारी दाखल केली. हे सर्व माजी नगरसेवक असल्याने समाजातील अन्य घटकांना संधी मिळणार नाही. पुरेसे संख्याबळ नसतानाही राष्ट्रवादीने अ‍ॅड. गणेश घोलप यांचा अर्ज दाखल करून आपण वकिलास संधी देत असल्याचा मानभावीपणा केला आहे.

Web Title: Ex-corporators will be approved members?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.