माजींच्या दौऱ्यावर १० लाख उधळले
By admin | Published: November 23, 2015 01:04 AM2015-11-23T01:04:06+5:302015-11-23T01:04:06+5:30
पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्यांना १० लाखांची उधळपट्टी करून उत्तरांचल येथील अभ्यास दौऱ्यावर महापालिकेने पाठविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
राजू काळे, भाईंदर
पालिकेच्या उद्यान व वृक्ष प्राधिकरण समितीच्या माजी सदस्यांना १० लाखांची उधळपट्टी करून उत्तरांचल येथील अभ्यास दौऱ्यावर महापालिकेने पाठविल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
वृक्ष प्राधिकरण समितीच्या १६ नवीन सदस्यांची नियुक्ती १५ आॅक्टोबरच्या महासभेत केली आहे. त्यामुळे त्यापूर्वीचे सदस्य समितीत नसले तरी त्यांच्या कार्यकाळात त्यांनी उत्तरांचल येथे अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली १० लाखांची तरतूद प्रशासनाने केली होती. या दौऱ्याच्या ठरावाला समितीने आॅगस्ट महिन्यात मान्यता दिली असली तरी त्याची वेळ मात्र निश्चित केली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात सध्याचे शिवसेनेचे उपमहापौर प्रवीण पाटील यांचाही समावेश होता.
या १६ सदस्यांची मुदत १ नोव्हेंबरला संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती महिन्यापूर्वीच झाल्याने तत्कालीन सदस्यांचा आता वृक्ष प्राधिकरण समितीशी कोणताही संबंध नाही. समितीवरून पायउतार झाल्यानंतरही या तत्कालीन सदस्यांचा उत्तरांचल राज्यातील हरिद्वार व देहरादून येथे २१ नोव्हेंबर रोजी दौरा आयोजिला होता. ते कालच रवाना झाले.