तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात

By सुरेश लोखंडे | Published: November 23, 2023 08:50 PM2023-11-23T20:50:48+5:302023-11-23T20:51:13+5:30

७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची  रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे.     

Examination fee of recruitment canceled three years back from Thane ZP An amount of two lakhs in the candidate's account | तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात

तीन वर्षांपूर्वी रद्द झालेल्या भरतीचे परीक्षा शुल्क ठाणे जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात

सुरेश लोखंडे, ठाणे तीन वर्षांपूर्वीचे परीक्षा शुल्क जि.प.कडून परत; दोन लाखांची रक्कम उमेदवारांच्या खात्यात  लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : येथील जिल्हा परिषदेने गट क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी मार्च २०१९ व ऑगस्ट २०२१ ला  अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह 'महाभरती'  भरती प्रक्रिया राबवली होती. पण दरम्यान ही भरती  पूर्णपणे रद्द करण्यात आली. त्यामुळे उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क आता परत करण्यात येत आहे. उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये या परीक्षा शुल्काची जमा केली जात आहे. त्यानुसार ७४४ उमेदवारांची परिक्षा शुल्कची  रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केली आहे.                

ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत गट - क संवर्गातील पदे भरती करीता www.mahapariksha.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्या जाहिरातीस अनुसरून भरती करता ११ हजार ५८८ अर्ज प्राप्त झाले होते. पण या भरतीची परिक्षा व संपुर्ण भरती प्रक्रीया रद्द करण्यात आल्यामुळे.  उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क उमेदवारांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे.   

जिल्हा परिषद ठाणे च्या संकेस्थळावर परिक्षा उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांच्याकडे असलेले युजर आयडी व पासवर्डचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने शुल्क परत मिळण्यासाठी कळवले होते. या संकेतस्थळावरील प्राप्त माहितीनुसार ३१ ऑक्टोंबर या कालाधीतील एक हजार ४४७ अर्जदारांपैकी ज्यांनी परिपूर्ण माहिती संकेतस्थळवर भरली होती त्या ७४४ उमेदवारांना परिक्षा शुल्क पोटी रक्कम दोन लक्ष १४ हजार २५० रुपये जिल्हा परिषदेने परतही केले आहे. याप्रमाणे अद्याप ज्या उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परिक्षा शुल्क मिळण्यासाठी अर्ज केलेले नाही, त्यांनी युजर आयडी व पासवर्डचा वापर करून जि.प. च्या  https://maharddzp.com या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने त्यांच्या बँक खात्याचा तपशील भरावा. जेणेकरून परिक्षा शुल्क पोटी असलेली रक्कम परत मिळवता येईल.  
 

Web Title: Examination fee of recruitment canceled three years back from Thane ZP An amount of two lakhs in the candidate's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.