उत्तनचा कचरा पुन्हा पेटण्याची चिन्हे

By admin | Published: March 2, 2016 01:49 AM2016-03-02T01:49:34+5:302016-03-02T01:49:34+5:30

भार्इंदरच्या उत्तन धावगी येथे बेकायदा सुरू असलेल्या डम्पिंगविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा पवित्रा डोंगरी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला

Excellence of excavation, signs of rejuvenation | उत्तनचा कचरा पुन्हा पेटण्याची चिन्हे

उत्तनचा कचरा पुन्हा पेटण्याची चिन्हे

Next

मीरा रोड : भार्इंदरच्या उत्तन धावगी येथे बेकायदा सुरू असलेल्या डम्पिंगविरुद्ध आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा पवित्रा डोंगरी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. या प्रश्नावर पालिकेची नेमकी भूमिका समजून घेण्यासाठी आयुक्तांची भेटही घेतली जाणार आहे. मात्र ग्रामस्थांच्या पवित्र्यामुळे बेकायदा डम्पिंंगचा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.
धावगीच्या डोंगरावर शासनाने घनकचरा प्रकल्पासाठी दिलेल्या जागेत प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने २००७ साली हेंजर बायोटेक या ठेकेदार कंपनीला परवानगी दिली होती. परंतु ती प्रक्रिया नेमकेपणाने करता न आल्याने कचऱ्याची प्रचंड दुर्गंधी पसरली. परिणामी, २०१० मध्ये ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्याला हिंसक वळण लागले. त्या वेळी वरसावे येथे प्रकल्प सुरु करू, असे आश्वासन पालिकेने दिल्याने पुन्हा तात्पुरत्या स्वरूपात उत्तनचा कचरा प्रकल्प सुरु झाला. प्रत्यक्षात प्रकल्प अपयशी ठरला. परिसरात दुर्गंधी, दुषित पाणी आणि आग लागून प्रदूषण होतच होते. अडीच वर्षापासून प्रकल्पच बंद पडल्याने दररोज सुमारे े४०० टन कचरा येथे प्रक्रि या न करताच टाकला जात आहे . त्यामुळे येथील नागरी संघर्ष समितीने गेल्या वर्षी मे मध्ये हरित लवादाकडे याचिका दाखल केली. तेव्हा पालिकेने सकवार येथे १८ महिन्यात प्रकल्प सुरु होणार असून त्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगितले होते. लवादाने मात्र एस्क्रो खाते काढून त्यात ७० कोटी भरण्यास सांगितल्याने पालिकेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन लवादाचे आदेश रद्द करून घेतले. तेथेही सकवार येथे प्रकल्प सुरु करणार असल्याचे आश्वासन पालिकेने दिले होते.
दरम्यान, उत्तन येथे साचलेल्या आणि दररोज नव्याने येणार्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेला आयआयटीचे मार्गदर्शन घेण्यासही न्यायालयाने सांगितले. त्याला दहा महिने उलटले, पण सकवार येथील प्रकल्प उभारणी दृष्टीपथात नाही. तेथील जमीनही पालिकेच्या नावे नाही. वन खात्याची परवानगी नाही. कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झाले असून रहिवाशी त्रस्त आहेत. ही वस्तुस्थिती सर्वांपुढे यावी आणि पुढे काय भूमिका घ्यायची, हे ठरविण्यासाठी रविवारी डोंगरी येथे बैठक झाली. तिला नगरसेवक बर्नड डिमेलो, माजी नगरसेवक लिओ कोलासो, हेरल बोर्जीस, जेम्स कोलासो यांच्यासह रेनॉल्ड बेचरी, विद्याधर रेवणकर तसेच चौक, पाली, उत्तन, डोंगरी गावचे पाटील आणि गाव समितीचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Excellence of excavation, signs of rejuvenation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.