बहिष्काराला राज ठाकरे अनुकूल, सेनेपुढे प्रश्न
By admin | Published: October 11, 2015 12:20 AM2015-10-11T00:20:24+5:302015-10-11T00:20:24+5:30
२७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीने मनपा निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास शुक्रवारी मनसे सुप्रिमो राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. मात्र, २७ गावांतील २१ प्रभागांतून कोणीच
चिकणघर : २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण हक्क समितीने मनपा निवडणुकीवर टाकलेल्या बहिष्कारास शुक्रवारी मनसे सुप्रिमो राज ठाकरे यांनीही पाठिंबा दिला. मात्र, २७ गावांतील २१ प्रभागांतून कोणीच उमेदवारी अर्ज भरणार नाही, याबाबत दक्षता घेण्याचा सल्लाही त्यांनी समितीला दिला. शुक्रवारी डोंबिवलीत आले असता जिमखान्यात त्यांची संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत भेट झाली. त्या वेळी त्यांनी बहिष्काराबाबत सकारात्मक भूमिका घेतली.
१० आॅक्टोबरपर्यंत २७ गावांतून आॅफलाइन वा आॅनलाइन एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र, सोमवारी आणि मंगळवारी असे दोनच दिवस आता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले असून इच्छुक आणि संघर्ष समितीसाठी तणाव निर्माण करणारे ठरण्याची शक्यता आहे. शिवसेनेने मात्र आपली भूमिका अद्यापही जाहीर केली नसल्याने २७ गावांत तणाव निर्माण होऊ शकतो. दरम्यान, संघर्ष समितीने शांतता मार्गाने चाललेल्या बहिष्काराच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा संशय व्यक्त केला. (वार्ताहर)