जाहिरातींच्या बदल्यात दुभाजकांसह चौक होणार चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:45 AM2021-08-25T04:45:05+5:302021-08-25T04:45:05+5:30

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. क्रेडाई-एमसीएचआय बिल्डर संघटनेशी महापालिका प्रशासनाने सामंजस्य करार केला आहे. यानुसार एमसीएचआयला ...

In exchange for advertisements, there will be squares with dividers | जाहिरातींच्या बदल्यात दुभाजकांसह चौक होणार चकाचक

जाहिरातींच्या बदल्यात दुभाजकांसह चौक होणार चकाचक

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. क्रेडाई-एमसीएचआय बिल्डर संघटनेशी महापालिका प्रशासनाने सामंजस्य करार केला आहे. यानुसार एमसीएचआयला पाच वर्षे जाहिरातीचे हक्क देऊन २२ रस्त्यांवरील दुभाजक आणि सात वाहतूक बेटे सुशोभित केली जाणार आहेत.

महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करताना एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांच्यासह शहर अभियंत्या सपना कोळी-देवनपल्ली आदी उपस्थित होते. या दुभाजकांसह वाहतूक बेटांची देखभाल-दुरुस्ती आणि त्यांची निगा एमसीएचआय राखणार आहे. हा कालावधी पाच वर्षांसाठीचा आहे. चौकातील हिरवळीसाठी झाडे लावणे, प्रत्येक रस्ता दुभाजकाला गार्ड स्टोन लावून वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे, वर्षातून दोनवेळा पाण्याने धुणे, किरकोळ देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी बिल्डरांकडे असेल. त्या बदल्यात वाहतूक बेटे आणि रस्ता दुभाजकावर विद्युत खांबांवरील जाहिरातीचे हक्क संबंधित बिल्डरला विनाशुल्क स्वरुपात दिले आहेत. तसेच सामाजिक संदेश व महापालिकेचे जनजागृतीपर संदेश लावणे बिल्डरला बंधनकारक राहणार आहे.

*हे दुभाजक/चौक होणार सुशोभित

पुना लिंक रोड, सूचकनाका, चक्कीनाका, मलंग रोड, साकेत कॉलेज, नेतीवली, मुरबाड वळण रस्ता, प्रेम ऑटो, दुर्गाडी, गांधी रोड, संतोषी माता रोड, बेतूरकरपाडा रोड, खडकपाडा रोड, बारावे रोड, बिर्ला कॉलेज रोड, निक्कीनगर, माधव संकल्प, कोलवली, सत्यम होम्स, शहाड पूल, मोहने रोड, टिटवाळा स्टेशन रोड, काळी मशीद, घरडा सर्कल, मंजुनाथ शाळा, ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले, आधारवाडी, वायलेनगर या परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे.

फोटो-कल्याण-करार

------------------

Web Title: In exchange for advertisements, there will be squares with dividers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.