ठाण्यातील दारू अड्यावर उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र: रसायनासह दहा लाखांचा मुद्देमाल नष्ट
By जितेंद्र कालेकर | Published: July 4, 2024 06:49 PM2024-07-04T18:49:16+5:302024-07-04T18:49:23+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क ठाणे: ठाणे जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निमिर्तीच्या अड्डयावर धाडसत्र सुरुच आहे. ठाण्यातील देसाई ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाणे जिल्हयात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारु निमिर्तीच्या अड्डयावर धाडसत्र सुरुच आहे. ठाण्यातील देसाई खाडी परिसरात असलेल्या गावठी दारुच्या अड्डयांवर भरारी पथकाने धाड टाकून गावठी दारुसह दारुच्या निमिर्तीसाठी लागणाऱ्या रसायनासह दहा लाख १५ हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची माहिती काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी गुरुवारी दिली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशानुसार हातभट्टी दारूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ३ जुलै २०२४ राेजी ही धाडसत्र माेहीम राबविण्यात आली. त्याच अनुषंगाने विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक डाॅ. निलेश सांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाने देसाई खाडीमध्ये असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणांवर धाड टाकून ती उद्ध्वस्त केली. या कारवाईमध्ये ११ बेवारस िठकाणी गुन्हे नोदविले आहेत. त्याठिकाणी ३५ लीटर हातभट्टी दारू आणि २० हजार २०० लीटर रसायन तसेच इतर साहित्यासह मुद्देमाल नष्ट केला. या मोहिमेमध्ये विभागीय उप आयुक्त पवार यांनी स्वतः आपल्या पथकांसह तीन बोटींमधून जाऊन खाडीतील हातभट्टी निर्मिती ठिकाणे उद्ध्वस्त केली. ही हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे चालवणाऱ्यांचा शाेध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या तसेच एमपीडीए कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यानंतरही अशा कारवाई चालूच ठेवून हातभट्टी दारू निर्मिती ठिकाणे समूळ नष्ट करणार असल्याचा दावाही पवार यांनी केला आहे.