पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:19+5:302021-03-04T05:17:19+5:30

ठाणे : सुमारे ९० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले पारसिक आणि मासुंदा तलाव चौपाटीचे काम प्रगतीपथावर आहे. यातील पारसिक ...

Excluding 50 per cent share of Persian Chowpatty | पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळला

पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळला

Next

ठाणे : सुमारे ९० कोटी रुपये खर्चून सुरू असलेले पारसिक आणि मासुंदा तलाव चौपाटीचे काम प्रगतीपथावर आहे. यातील पारसिक चौपाटीचा ५० टक्के हिस्सा वगळून तिचे काम करण्यात येत आहे.

पारसिक चौपाटीला ठाणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, या चौपाटीचे काम मार्गी लागणे गरजेचे होते. यासाठी सुमारे ७५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, येथील जागेत बाधित झालेल्या काहींचे पुनर्वसन न झाल्याने या चौपाटीचे काम रखडले होते. परंतु, आता या चौपाटीचा तेवढा हिस्सा वगळून उर्वरित ५० टक्के काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे.

- मासुंदा चौपाटीचे कामही होणार पूर्ण

सध्या स्मार्टसिटीअंतर्गत मासुंदा तलाव परिसर सुशोभिकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी १४ कोटींचा खर्च केला जात आहे. त्यानुसार हे कामदेखील डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे. तसेच येथील ग्लास पाथवेचे कामही याच बरोबर पूर्ण होणार आहे.

दुसरीकडे स्मार्ट मोबिलिटी या प्रकल्पाचे कामही येत्या डिसेंबरअखेर पूर्ण करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांसाठी सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पादचाऱ्यांना रस्त्यांवर किंवा फूटपाथवरून योग्य पद्धतीने चालता यावे, त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने हे काम हाती घेतले आहे.

Web Title: Excluding 50 per cent share of Persian Chowpatty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.