दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूंचे प्रदर्शन, विक्री मेळावा जल्लोषात
By सुरेश लोखंडे | Published: December 22, 2023 07:30 PM2023-12-22T19:30:26+5:302023-12-22T19:31:10+5:30
येथील मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करून यख दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा सुरू करण्यात आला आहे.
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने ५ टक्के दिव्यांग कल्याण सेस फंडातून या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या उपक्रमातून दिव्यांग व्यक्तिने, दिव्यांगाच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा जि प.च्या आवारात आजपासून सुरू झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
येथील मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करून यख दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळावा आज पासून सुरू करण्यात आला आहे. हे प्रदर्शन व विक्री मेळावा २६ डिसेंबर या दरम्यान सकाळी ९ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत आहे. ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले जिल्हा परिषद, प्रांगण, ठाणे स्टेशन, ठाणे (प) येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनास व विक्री मेळाव्यास भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांनी व संस्थानी बनविलेले वस्तु खरेदीसाठी ठाणेकर ग्राहकांनी प्रतिसाद द्यावे , असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रगती अंध विद्यालय, बदलापुर येथिल दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध गाणी गाऊन प्रदर्शनाची व विक्री केद्रांची शोभा वाढवली. स्टॉलवर विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या वस्तूंमध्ये तोरण, रुमाल पेंटिंग, कार्ड फुले, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुले, कापडी पिशवी, फाईल, दिव्यांग उपयोगी काठी व इतर सर्व वस्तूचा समावेश आहे. प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एकूण १८ विक्री कक्ष (स्टॉल) उभारण्यात आले आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता बाधंकाम सुनिल बच्छाव, लघुपाट बंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजंली अंबेकर, इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.