विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 02:39 AM2019-12-28T02:39:52+5:302019-12-28T02:39:57+5:30

मान्यवरांचे विचार : विद्यार्थ्यांना ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार

Expectations should not be imposed on students | विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नये

विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे लादू नये

Next

नवी मुंबई : विद्यार्थ्यांनी फक्त गुणांच्या पाठीमागे न लागता सर्वांगीण विकासावर भर द्यावा. गुणांपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य दिले पाहिजे. पालकांनीही आपल्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत, असे आवाहन ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांनी केले.

नवी मुंबईमधील बोंगिरवार भवनमध्ये ‘लोकप्रज्ञा’ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. वाशीमधील राजीव गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य वासू पांडे यांनी पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्सहन मिळत असल्याचे सांगितले.
नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक रश्मी पगार यांनी, विद्यार्थ्यांनी फक्त गुणांच्या मागे धावू नये. गुणांना नाही तर गुणवत्तेला प्राधान्य दिले पााहिजे. पालकांनी त्यांच्या अपेक्षा मुलांवर लादू नयेत. मुलांचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे, ते पाहून प्रोत्साहन द्यावे, असे मतही त्यांनी या वेळी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी ‘लोकमत’ मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर व सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

‘लोकप्रज्ञा’ पुरस्कार विजेते : वेदान्त संदीप पाटील, पंकज विष्णू चौधरी, श्रेयस संतोष तवटे, अबिबा खलील गिरकर, आयुष राजाराम जाधव, दूर्वा सनतकुमार सिद्धेश्वर, रिद्धिश पंकज रोडेकर, निशांत मिलिंद सपकाळ, जिया जमीर काझी, सार्थक अमर चव्हाण, तन्मय राजाराम जाधव, नेताल ओमप्रकाश लोहिया, ओजस्वी उमेश कुलकर्णी, प्रथमेश सनतकुमार सिद्देश्वर, प्रतीक्षा प्रकाश शिंदे, यश प्रभाकर पाटील, ओजस मोर्या, सिद्धी रितेश वाघ, समृद्धी संदेश साळुंखे, प्रतीक रामदास सोनावणे, मंजिरी विद्याधर पोखरकर, धनश्री सर्जेराव पाटील, आशाना समीर पटेल.

Web Title: Expectations should not be imposed on students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे