एक्सपायर्ड औषधे आणली,ठेवली,फेकली

By admin | Published: August 9, 2016 02:19 AM2016-08-09T02:19:00+5:302016-08-09T02:19:00+5:30

गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा

Expedged drugs have been brought, kept, thrown away | एक्सपायर्ड औषधे आणली,ठेवली,फेकली

एक्सपायर्ड औषधे आणली,ठेवली,फेकली

Next

आरीफ पटेल, मनोर
गोरगरीब व आदिवासी रूग्णांसाठी कालबाह्य झालेली औषधे पाठवायची, ती ठेवायची व नंतर फेकून द्यायची व रुग्णांना बाहेरून महागडी औषधे आणायला लावायची असा औषध घोटाळा येथील ग्रामीण रुग्णालयात घडतो आहे. मोठा औषधसाठा आवारात असलेल्या एका इमारतीजवळ फेकून दिल्याचे उघडकीस आल्यानंतर हा भंडाफोड झाला. एक पारिचारीकेने सांगितले की, त्या औषधांची मुदत संपलेली आहे म्हणून तो बाहेर ठेवला आहे.
२०१४ पासून फार्मसिस्ट नसल्याने ग्रामीण रूग्णालयात अंदाधुंद कारभार सुरू आहे. २०१५ मध्ये आणलेली औषधे गोरगरीबांना न दिल्यामुळे पडून राहिली व कालबाह्य ठरली. त्यामध्ये आयब्रुप्रोफिन, ओरल सस्पेन्शन, आयओडी डेक्सट्रास, मेट्रोनिडाझोल टॅब्लेट, आर्यन सिरप, (गरोदर महिलांसाठी) अमोक्स
सीलीन पॉटेशिअम (लहान मुलांसाठी) अशा अनेक औषधांचे बॉक्स मुदत संपली म्हणून फेकून दिलेत असे सांगितले.
परंतु प्रत्यक्षात २०१४ मार्चमध्ये मुदत संपलेला हा औषधांचासाठा आॅगस्ट २०१५ ला येथे आणला गेला. त्यानंतर तो पडू दिला व मुदत संपल्याच्या नावाखाली ७ महिन्यानंतर फेकण्यात आला असे चित्र उजेडात आले आहे मुदत संपल्यानंतरही काही मोजक्या रूग्णांना औषधे दिले गेले असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. लाखो रूपयांचा औषधसाठा प्रत्येक ग्रामीण रूग्णालयाच्या अधीक्षक व फार्मसिस्ट यांच्या हलगर्जीपणामुळे अशाच प्रकारे न वापरता फेकावा लागतो. आणि गरीब रूग्णांना बाहेरून विकत औषध आणावयास भाग पाडले जात आहे.
डॉ. कांचन वानिडे सिव्हील सर्जन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन रिसिव्ह केला नाही. डॉ. केळकर अतिरीक्त जिल्हा चिकित्सालय म्हणाले आम्हाला याची माहिती मिळालेली नाही आम्ही ग्रामीण ग्रामीण रूग्णालयामध्ये चौकशी करतो.

Web Title: Expedged drugs have been brought, kept, thrown away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.