परप्रांतीय फेरीवाल्यांना शहरातून हाकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:47 AM2021-09-04T04:47:25+5:302021-09-04T04:47:25+5:30
डोंबिवली : डोंबिवली शहर बेकायदा परप्रांतीय फेरीवाल्यांपासून मुक्त करावे, असे पत्र मराठी एकीकरण समितीने (महाराष्ट्र राज्य) केडीएमसीला दिले ...
डोंबिवली : डोंबिवली शहर बेकायदा परप्रांतीय फेरीवाल्यांपासून मुक्त करावे, असे पत्र मराठी एकीकरण समितीने (महाराष्ट्र राज्य) केडीएमसीला दिले आहे. मराठी भाषिकांचे अधिकारी यांची बिगरराजकीय चळवळीच्या माध्यमातून रक्षण म्हणून महाराष्ट्र राज्यात प्रतीकात्मक स्वरूपाचे प्रतिनिधित्व मराठी एकीकरण समिती करते.
परप्रांतीय फेरीवाल्यांकडून ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेला हल्ला पाहता मराठी समाज भयभीत झाला आहे. स्थानिक मराठी भाषिक समाजाला असुरक्षितता वाटू लागली आहे. परप्रांतीय अमराठी फेरीवाल्यांवर कारवाई करून डोंबिवली शहर बेकायदा परप्रांतीय फेरीवाला मुक्त करावे, याकडे मराठी एकीकरण समितीने लक्ष वेधले आहे. रेल्वेस्थानक परिसरात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १५० मीटर अंतरापर्यंत व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मनाई करण्यात आली आहे. डाेंबिवली रेल्वेस्थानकाबाहेरचा परिसर याला अपवाद ठरत आहे. तातडीने फेरीवाला पुनर्वसन धोरणाची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.