जिल्ह्यात या ४७ सिंचन विहिरींसाठी दीड कोटी खर्च अपेक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:41 AM2021-03-17T04:41:34+5:302021-03-17T04:41:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील या ४७ सिंचन विहिरींच्या कामासाठी एक कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील या ४७ सिंचन विहिरींच्या कामासाठी एक कोटी ४१ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यापैकी एक कोटी २९ लाख रुपये खर्चाच्या विहिरींना मंजुरीही प्राप्त झाली आहे. कामाच्या प्रगतीस अनुसरून शेतकऱ्यांना खर्च दिला जात आहे. विहीर खोदण्यापासून तर तिचे बांधकाम करून त्या ठिकाणी नरेगाअंतर्गत विहिरीच्या कामाला मंजुरी असे बोर्ड लावण्यापर्यंत ८०० मनुष्य दिनांचे काम करण्यात येत आहे.
* शहापूर तालुक्यातून सर्वाधिक प्रस्ताव-
तलावांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ४५ शेतकऱ्यांनी सिंचन विहिरीच्या कामासाठी प्रस्ताव दिले आहेत. त्यापैकी ४१ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. एक कोटी २३ लाख रुपये खर्चाच्या या विहिरींची कामे सुरू आहेत. उर्वरित चार कामांना लवकरच मंजुरी अपेक्षित आहे.
...........
प्रतिक्रिया- शेतकऱ्यांनी प्रस्ताव करताच त्यास आता तालुका पातळीवर गटविकास अधिकाऱ्यांकडून तत्काळ मंजुरी दिली जात आहे. यासाठी ४ मार्चलाच नवा जीआर आलेला आहे. कल्याण, अंबरनाथ, तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्रस्ताव आलेले नाहीत. या तालुक्यांमध्ये सध्या शहरीकरण वाढत आहे. शेतकऱ्यांनी प्रस्ताव करून या सिंचन विहिरींचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेणे गरजेचे आहे.
- समिना शेख
अधिकारी एम.जी. नरेगा कार्यालय, ठाणे
...........
* विहिरींसाठी जिल्ह्यातून आलेले प्रस्ताव -४७
* मंजुरीच्या प्रतीक्षेतील प्रस्ताव - ०४
.........
* तालुकानिहाय प्रस्ताव -
१) शहापूर तालुका - ४५
२) भिवंडी - ०२