कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2020 05:36 PM2020-09-07T17:36:26+5:302020-09-07T17:36:40+5:30

शिवसेना - भाजपची चौकशीची मागणी 

Expired biscuits and insect repellent for Corona patient? in udlhasnagar | कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी? 

कोरोना रुग्णासाठी एक्सपायरी झालेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी? 

Next
ठळक मुद्देउल्हासनगरात ८ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यासाठी जाणारा टेम्पो भाजपा व मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडला

उल्हासनगर : कोरोना रुग्णासाठी आणलेले एक्सपायरी डेट संपलेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडीचा टेम्पो महापालिका मुख्यालय प्रांगणात भाजप, मनसे पदाधिकारी यांनी रविवारी सायंकाळच्या दरम्यान पकडला. या प्रकाराने एकच खळबळ उडाली असून महापालिकेने याबाबत कानावर हात ठेवले. तर शिवसेना भाजप ने महापालिकेच्या ढिसाळ कारभारावर टिका करून चौकशीची मागणी केली.

उल्हासनगरात ८ हजार पेक्षा जास्त कोरोना रुग्ण मिळाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के पेक्षा जास्त आहे. कोविड सेंटरमध्ये रुग्णांना देण्यासाठी जाणारा टेम्पो भाजपा व मनसे पदाधिकाऱ्यांनी पकडला. टेम्पोमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण आणि एक्सपायर झालेले बिस्किट आढळून आल्याने महापालिका अधिकारी यांच्याकडे विचारणा करण्यात आली. मात्र त्यांना निश्चित माहिती देता आली नाही. जनसंपर्क अधिकारी युवराज भादाणे यांनी टेम्पो चालकाकडे महापालिका विषयी कोणतेही कागदपत्रं आढळले नसल्याने, ते साहित्य महापालिकेचे नाही. अशी भूमिका पत्रकार सोबत बोलताना दिली. मात्र मग टेम्पो पालिकेत आलाच कसा? असा पवित्रा भाजप व मनसे पदाधिकारी यांनी घेवून टेम्पोला महापालिका प्रांगणात उभे करून ठेवले. 

महापालिका स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी आक्रमक भुमिका घेवून कोरोना रुग्णाच्या जीवासी खेळ चालू असल्याचा आरोप केला. तर पक्षाचे दुसरे पदाधिकारी कपिल अडसूळ यांनी पदाधिकाऱ्यांसह मध्यवर्ती पोलीस ठाणे गाठून टेम्पो चालकासह सबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच पत्र महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांना दिले. आमदार व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करून महापालिका कारभारावर टीका केली. मनसेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख यांनी एक्सपायरी डेट असलेले बिस्कीट व किडे पडलेली खिचडी महापालिकेला कोरोना रुग्णासाठी कोणी पाठविले. महापालिकेची भूमिका व काय कारवाई करणार. याबाबतची चौकशी करण्याची मागणी केली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनीही याबाबत सखोल चौकशीची मागणी केल्याने महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांच्या कार्यपद्धतीवर सर्वस्तरातून टीका होत आहे.

यापूर्वीही असाच निकृष्ट दर्जाचे अन्न 

महापालिका स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी असेच निकृष्ट अन्नाचे पॉकेट आले होते. असा गंभीर आरोप केला. निकृष्ट दर्जाचे अन्न आणणारे टेम्पो पकडले असून महापालिकेने आपली भूमिका स्पष्ट करून संबंधितावर कारवाई करण्याची मागणी वधारिया यांनी केले आहे. तर महापालिका ठेकेदार अन्य जणांना पाठीशी घालत असल्याचीही टीका त्यांनी केली.
 

Web Title: Expired biscuits and insect repellent for Corona patient? in udlhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.