भिवंडीत २४ लाखांचा मुदतबाह्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त
By नितीन पंडित | Published: April 4, 2024 05:58 PM2024-04-04T17:58:45+5:302024-04-04T17:59:11+5:30
भिवंडीत मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणावर सर्रासपणे सुरू आहे.
नितीन पंडित, भिवंडी: शहरातील संख्या झोपडपट्टी विभागातून मुदतबाह्य खाद्यपदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणा वर सर्रासपणे सुरू आहे.या विरोधात अन्न आणि औषध प्रशासन कोणतीही कारवाई करताना दिसत नाही.
शहरातील न्हावी पाडा येथील एका कारखान्यात रफिक सिध्दीक मेमण यांनी आपल्या गाळ्यात २४ लाख १५ हजार रुपयांची छापील किंमत असलेले मेयोनिज व टॅमोटो केचप असे मुदतबाह्य अन्न खादय पदार्थ हे मानवी जिवीतास धोका व अपायकार असल्याचे माहीती असताना देखील विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली असता पोलिस पथकाने घटनास्थळी छापा टाकून तेथील सर्व मुदतबाह्य साठा जप्त करीत रफिक सिध्दीक मेमण या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.