पैशांचा पाऊस, महिलांचे शोषण; सात जणांची टोळी गजाआड
By अजित मांडके | Published: March 2, 2024 05:38 PM2024-03-02T17:38:12+5:302024-03-02T17:38:55+5:30
राबोडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अजित मांडके , ठाणे : गरजू मुली अथवा महिला यांना हेरुन त्यांना पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून तशा आशयाचा व्हिडीओ दाखवून मुली, महिलांचा विश्वास संपादन करुन त्यांचे शोषण करणाºया सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा घटक एक ने अटक केली आहे. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, त्यांनी महाराष्टÑातील विविध ठिकाणी अशाच पध्दतीने मुली आणि महिलांना फसविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तर यातील अटक आरोपी पैंकी बहुतेक आरोपी हे राबोडी भागातच वास्तव्यास असल्याचे तपासात पुढे आले आहे.
या गुन्ह्यात असलम शमी उल्ला खान (५४) रा. राबोडी, सलीम जखरुद्दीन शेख (४५) रा. राबोडी यांना १७ फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता, यातील मांत्रिक बाबा साहेबलाल वजीर शेख उर्फ युसुफ बाबा (६१) रा. अगरवालवाडी अॅटॉंप झोपडपट्टी यांनी २७ फेब्रुवारी अटक करण्यात आली. त्यांनी १ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तसेच या गुन्ह्यातील तौफीक शेख (३०) रा. राबोडी, शबाना शेख (४५) रा. राबोडी, शबिर शेख (५३) रा. राबोडी यांना अटक करण्यात आली आहे. तर १ मार्च रोजी यातील हितेंद्र शेट्टे (५६) रा. लालबाग याला देखील अटक करण्यात आल्याची माहिती राबोडी पोलीसांनी दिली. राबोडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शोध सुरु होता. त्यानुसार यातील पिडीत मुलगी हिला पैशाचा पाऊस पाडणाºया टोळीने तिची दिशाभुल करुन स्वत:च्या ताब्यात ठेवले असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तीचा शोध घेतला व मुलीला विश्वासात घेऊन तिच्याकडे चौकशी केली असता, तिने पैशांचा पाऊस पाडणारी टोळी सक्रीय असल्याची माहिती दिली. त्यानुसार गुन्हा घटक शाखा १ ने कारवाई करीत सात जणांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडे अधिक चौकशी केली असता, गरजू मुली अथवा महिला यांना हेरुन त्यांना पैशाचा पाऊस पडतो यावर विश्वास बसावा यासाठी त्यांच्या मोबाइलमध्ये रेकॉर्डींग करुन ठेवण्यात आलेला व्हिडीओ पिडीत मुलींना दाखविला जात होता. ज्या व्हिडीओमध्ये एक महिला नग्न अवस्थेत झोपलेली असून तिच्या बाजूला पैशांचा ढिगारा पडलेला दिसत असलेला व्हिडीओ दाखवून पिडीत मुलींचे मन आकर्षित करुन करोडो रुपये मिळतील याचे प्रलोभन दाखवून त्यांना विधी करण्यासाठी तयार केले जात होते. तसेच आरोपींनी पिडीत मुलींनी असेही सांगितले की, मांत्रिक विधीदरम्यान पूजा करणारा अथवा तेथे हजर असलेला इसमाच्या अंगात जीन येईल व त्याला त्या विधीला बसलेली नग्न महिलेसोबत, मुलीसोबत संभोग करण्याची इच्छा होईल व जेव्हा तो त्या नग्न मुलगी, महिलेसोबत संभोग केल्यानंतर शुख होईल तेव्हा करोड रुपयेचा पाऊस पाडतो. अशा प्रकारे अनेक महिलांना मुलींना आरोपीतांनी त्यांच्या जाळ्यात फसवले गेल्याचे अटक आरोपी यांच्याकडे केलेल्या तपासात पुढे आले आहे. तर मुलींनी फसविणारी टोळी महाराष्टÑाच्या विविध ठिकाणी पसरल्याचेही तपासात पुढे आल्याने त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरिक्षक दिलीप पाटील, पोलीस निरिक्षक कृष्णा कोकणी आदींसह त्यांच्या पथकाने केली.