टाकीचा स्फोट; गरम तेल उडून तिघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 02:24 AM2017-08-02T02:24:18+5:302017-08-02T02:24:18+5:30
घोडबंदर रोडवरील एका इंजिनिअरिंग वॅर्कशॉपमधील प्रेस मशीनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत,
Next
ठाणे : घोडबंदर रोडवरील एका इंजिनिअरिंग वॅर्कशॉपमधील प्रेस मशीनच्या टाकीचा स्फोट झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या घटनेत, त्या टाकीतील गरम तेल उडून तीन कामगार जखमी झाले असून त्यांना मानपाड्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे. यामध्ये सुरेश वर्मा (२१), पन्नीलाल चौहान (३२) आणि कृष्णकुमार वर्मा (३०) अशी जखमींची नावे असल्याचे आपत्ती व्यवस्थापनाने सांगितले. याप्रकरणी चितळसर-मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.