उल्हासनगरातील कचरा उचलणाऱ्या ठेक्याची पोलखोल, संघटनेकडून कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 04:46 PM2024-01-19T16:46:03+5:302024-01-19T16:46:18+5:30
कामगार संघटनेने पुरावा दिल्यास आयुक्तांचे कारवाईचे संकेत
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : शहरातील कचरा उचलणारी कंपनी अटीशर्तीचे उल्लंघन करीत असून कंपनीवर कारवाई करण्याची मागणी लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख याना केली. तसेच पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, कामगार आयुक्त आदीना पत्र देऊन कामगारांचे प्रश्न सुटले नाहीतर, १ फेब्रुवारीपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
उल्हासनगर महापालिकेने शून्य कचरा संकल्प करून शहरातील कचरा उचलण्याचा ठेका कोणार्क नावाच्या कंपनीला दिला. कचरा उचलण्यावर दिवसाला ८ लाख, महिन्याला २ कोटी ४० लाख तर वर्षाला ३० कोटी रुपये खर्च केला जातो. अशी माहिती लढा कामगार संघटनेचे संदीप गायकवाड यांनी दिली. ठेक्याच्या अटीशर्तीनुसार कामगारांचे नियमित पगार काढले जात नसून त्यांना आरोग्य सुविधा दिल्या जात नाही. तसेच शासनानुसार कमीतकमी पगार दिला जात नाही. असा आरोप लढा संघटनेचे अध्यक्ष संदीप गायकवाड यांनी केला. तसेच शहरातून एकून २०० मेट्रिक टन कचरा निघत असतांना तो जास्त करण्यासाठी डंपर मधून माती व दगड आणून वजन ४०० मॅट्रिक टन केला जात असल्याचा गंभीर आरोप गायकवाड यांनी केला. कामगारांवर असाच अन्याय होत असेलतर १ फेब्रुवारी पासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
लढा कामगार संघटनेने कोणार्क कंपनीवर कारवाई करण्यासह अन्य आरोप केले. मात्र सर्व आरोप आयुक्त अजीज शेख यांनी फेटाळले आहे. तर अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी लढा कामगार संघटनेला पुरावा दिल्यास, कारवाईचे संकेत दिले. तसेच प्रभाग समिती क्रं-३ मध्ये साफसफाईचे खाजगीकरण केले असून साफसफाईचे कौतुक लेंगरेकर यांनीं केले. दुसरीकडे महापालिकेची शून्य कचरा संकल्पना यशस्वी झाली का? असा आरोप संदीप गायकवाड यांनी करून महापालिका अधिकाऱ्यांची पोलखोल केली. शहर कचरा मुक्त होत नसल्याने, ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी लढा संघटनेने केली आहे.
साफसफाई व कचरा उचलण्यावर प्रश्नचिन्हें
महापालिका हद्दीतील कचरा उचलण्याचा ठेका, महापालिका प्रभाग क्रं-३ मधील सफसफाईचे खाजगीकरण करून ठेका एकाच कंपनीला दिला. तसेच डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याचे सफाटीकरणावर वर्षाला अड्डीच कोटी खर्च केला।जातो. कचरा उचलणे, प्रभाग समिती क्रं-३ मधिल सफसफाईचा खाजगीकरण व डम्पिंगवरील कचऱ्याचे सफाटीकरण आदिवर एकून ४५ कोटी पेक्षा जास्त खर्च केला जातो. असा आरोप