एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक

By अजित मांडके | Published: May 3, 2024 03:47 PM2024-05-03T15:47:08+5:302024-05-03T15:47:34+5:30

मोदी यांच्यासाठी ४८ जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या असल्याचे मत भाजपचे गणेश नाईक यांनी व्यक्त केले.

Expressing one's desire is not a crime - Ganesh Naik | एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक

एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा नव्हे - गणेश नाईक

ठाणे : एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा आहे का?, मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याकरीता महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भुमिका घेतलेली आहे. त्यात नाराजी कार्यकर्त्यांमध्ये होती, ती हळूहळू कमी केली आहे. थोड्या वेळात नाराजी पूर्णपणे दूर केली जाईल. मोदी यांच्यासाठी ४८ जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या असल्याचे मत भाजपचे गणेश नाईक यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली हस्तांदोलन झाले, आणि चांगले काम करण्याचे निश्चित झाले आहे.

ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवीमुंबईत नाराजी नाट्य दिसून आले. संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी यावरुन अनेक पदाधिकाºयांनी राजीनामे दिले होते. मिराभाईंदर आणि ठाण्यातही हे लोन आल्याचे दिसून आले. परंतु ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची तत्काळ समजूत काढण्यात आली. परंतु नवीमुंबईतील पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब येतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता. परंतु रात्री उशिरा त्यांची नाराजी वरीष्ठांनी दूर केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर शुक्रवारी गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक आणि संदीप नाईक आदींनी हजेरी लावली होती. यावेळी गणेश नाईक यांनी मोदींसाठी काम करायचे असल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Expressing one's desire is not a crime - Ganesh Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.